Sunday, March 16, 2025
HomeमानिनीDiwali 2024 : दिवाळीत राशीनुसार द्या घराला रंग

Diwali 2024 : दिवाळीत राशीनुसार द्या घराला रंग

Subscribe

हल्ली 2- 3 वर्षांनंतर लोक आपल्या घराचा लूक बदलण्याचा विचार करतात. अशात सगळ्यात आधी प्रश्न पडतो तो म्हणजे घराला कोणता रंग लावावा? मग घराला रंग लावण्यासाठी दिवाळीचा काळच निवडला जातो. कारण दिवाळीच्या साफसफाईदरम्यान रंगकामही होऊन जातं. जर तुम्हीदेखील या दिवाळीत घराला रंग देण्याबद्दल विचार करत असाल तर रंग निवडीबाबत तुम्ही थोडा विचार करायला हवा.

खरंतर रंगांचा मूडसोबत माणसांच्या ऊर्जेवरही परिणाम होत असतो. जर तुम्ही तुमच्या राशीनुसार घराचा रंग निवडलात तर याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. इतकंच नव्हे तर योग्य रंग निवडल्याने तुमच्या घराला सुंदर लूकदेखील मिळेल. एक गोष्ट ध्यानात ठेवा की गडद रंग हा लहान खोलीला अधिक लहान बनवू शकतो. यासाठी खोलीच्या आकारमानाप्रमाणे रंगाची निवड करा.

मेष आणि वृषभ राशी:

मेष राशी असणाऱ्या लोकांसाठी लाल, पिवळा, गुलाबी आणि केशरी रंग शुभ मानला जातो. तर वृषभ राशीच्या लोकांसाठी गुलाबी आणि पांढरा रंग सगळ्यात चांगला असतो. अशात जर तुम्ही घराला लाइट शेड देणार असाल तर तुम्ही फिकट गुलाबी रंग घराला देऊ शकता.

मिथुन आणि कर्क राशी:

मिथुन राशीच्या लोकांसाठी हिरवा किंवा पिवळा रंग बेस्ट असतो. जर तुम्हाला हे दोन्ही रंग आवडत नसतील तर तुम्ही हिरवा किंवा पिवळा रंग यांचे अनेक शेडस वापरू शकता.कर्क राशीच्या लोकांनी आपल्या घरासाठी पांढरा, चंदेरी किंवा क्रीम रंग वापरावा. हे रंग तुमच्या घराला स्मूद टचही देऊ शकता.

Diwali 2024 : Color your house according to your zodiac sign on Diwali

सिंह आणि कन्या राशी :

जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर घराला नारंगी, चंदेरी आणि सोनेरी पिवळ्या रंगाचा वापर करायला हवा. हा रंग सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचं काम करतो. कन्या राशी असल्यास हिरवा, निळ्या किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. तुम्ही हवे असल्यास एका भिंतीवर पांढरा रंग आणि एका भिंतीवर फिकट पिवळा रंग असं कॉम्बिनेशनही करू शकता.

तूळ आणि वृश्चिक राशी :

तूळ राशी असणारे जर घराला रंगकाम करायचा विचार करत असाल तर तुम्ही क्रीम, गुलाबी आणि हलक्या निळ्या रंगाचा वापर करू शकता. बेडरुममध्ये गुलाबी आणि देवघरात फिकट हिरवा रंग लावता येऊ शकेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाल, पिवळा आणि केशरी रंग चांगला ठरू शकतो.

धनू आणि मकर राशी :

धनू राशीच्या लोकांनी आपल्या घराला पिवळ्या, लाल आणि जांभळ्या रंगाने डेकोरेट केलं पाहिजे. भिंतीला रंगकाम करण्यासाठी हे रंग सर्वोत्तम ठरू शकतात. मकर राशीसाठी निळ्या, आकाशी, जांभळ्या , हिरव्या रंगाचे रंगकाम केलं पाहिजे. शांती आणि सुख आणण्याचं काम हे रंग करतात.

कुंभ आणि मीन राशी :

जर तुमची राशी कुंभ असेल तर तुम्ही निळ्या आणि जांभळ्या रंगाचा विचार करा. मीन राशीच्या लोकांसाठी लकी रंग म्हणजे पिवळा, सोनेरी , क्रीम आणि केशरी. घराच्या सजावटीसाठी तुम्ही हे रंग वापरू शकता.


Edited By – Tanvi Gundaye

 

 

 

 

 

 

Manini