Monday, January 20, 2025
HomeमानिनीDiwali cleaning hacks : दिवाळीनंतर लादीवरचे रांगोळीचे डाग असे साफ करा

Diwali cleaning hacks : दिवाळीनंतर लादीवरचे रांगोळीचे डाग असे साफ करा

Subscribe

आजकाल प्रत्येक सणाला रांगोळी काढली जाते. तसेच दिवाळीच्या दरम्यान घराच्या सजावटीत रंगीबेरंगी रांगोळीला विशेष महत्त्व दिले जाते . हे घराचे सौंदर्य तर वाढवतातच, शिवाय याला धार्मिक महत्त्वही खूप आहे. पण दिवाळीनंतर रांगोळीचे डाग साफ करणे हे खूपच अवघड असते. बऱ्याचदा हे रांगोळीचे डाग जमिनीवर चिकटून राहतात. आपण कितीही प्रयत्न केलं तरी हे डाग जात नाही. हे डाग खराब दिसत नाहीत तर साफ करायला देखील अवघड असते. अडचणी निर्माण करतात. जर तुम्ही या कारणामुळे दिवाळीत रांगोळी काढण्यास टाळाटाळ करत असाल तर काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला काही सोप्या क्लीनिंग हॅक सांगत आहोत ज्याच्या मदतीने जमिनीवरील रांगोळीचे डाग सहज साफ करता येतात.

पाणी आणि साबण

बादलीमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडसं साबण घाला. आता यामध्ये स्पच किंवा कपडा बुडवून रांगोळीचे डाग पुसून घ्या.

व्हिनेगर

तुम्ही व्हिनेगरच्या मदतीने देखील रांगोळीचे डाग पुसू शकता. एका बादलीमध्ये पाणी आणि व्हिनेगर दोन्ही मिश्रण मिक्स करून घ्या. नंतर स्पचने घासून काढा.

बेकिंग सोडा आणि लिंबू

डाग अजून तसेच असतील तर तुम्ही लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट जिथे डाग आहे त्या भागात लावा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

डिटर्जंटचा वापर करा

काही डाग सहजपणे जात नाही अशावेळी तुम्ही डिटर्जंटचा वापर करू शकता. यासाठी थोडे पाणी घ्या यामध्ये डिटर्जंट मिक्स करून डागांवर लावा. काही वेळाने डाग ghasun पाण्याने स्वच्छ करा.

या उपायांनी तुमच्या घरातील लादीवरचे रांगोळीचे डाग सहजपणे निघून जातील.

 

 

हेही पाहा –


Edited By – prachi manjarekar

Manini