Tuesday, February 6, 2024
घरमानिनीFashionब्लॅक आउटफिटसोबत स्टाइल करा 'ही' ज्वेलरी

ब्लॅक आउटफिटसोबत स्टाइल करा ‘ही’ ज्वेलरी

Subscribe

मुलींना आउटफिट सोबत मेकअप आणि ज्वेलरी घालण्याची फार आवड असते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही एखादी ज्वेलरी वेअर करता तेव्हा मार्केटमध्ये जाऊन ती खरेदी करणे पसंद करता. परंतु काही वेळेस असे होते की, आउटफिटच्या रंगानुसार आपण ज्वेलरी खरेदी करत नाहीत. अशातच जर तुम्ही ब्लॅक आउटफिट्स वेअर करणार असाल तर त्यावर नक्की कोणती ज्वेलरी स्टाइल करावी हे पाहूयात.

-स्टोन वर्क ज्वेलरी

- Advertisement -

Designer fabric stone work choker necklace set for women and girls. | K M  HandiCrafts India
जर तुम्ही दिवाळीला ब्लॅक आउटफिट घालणार असाल तर तुम्ही स्टोन वर्क ज्वेलरी वेअर करू शकता. ब्लॅक कलरसोबत अशा प्रकारची ज्वेलरी उठून दिसते. खास गोष्ट अशी की, तुम्ही ब्लॅक ऐवजी विविध रंगाच्या आउटफिटवर ही ट्राय करू शकता. यामध्ये नेकलेसमध्ये स्टोन वर्क दिसून येईल. इअररिंग्स सुद्धा त्याच प्रकारचे घ्या.

-पर्ल डिजाइन ज्वेलरी

- Advertisement -

40 Simple and Modern Pearl Necklace Designs 2023
तुम्ही तुमच्या ब्लॅक आउटफिट सोबत पर्ल ज्वेलरी स्टाइल करू शकता. ही सुंदर दिसते. क्लासी लूक क्रिएट करण्यासाठी तुम्ही पर्ल डिझाइन ज्वेलरी खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही लेअर नेकलेस किंवा सिंपल नेकलेस खरेदी करू शकता. साडी, सूट किंवा इंडो वेस्टर्न कपड्यांवर ही ज्वेलरी सुंदर दिसेल.

-ब्रास ज्वेलरी सेट


ब्लॅक आउटफिट सोबत तुम्ही लॉन्च चेन नेकलेस वेअर करू शकता. हे सुंदर दिसतात. त्याचसोबत तुम्हाला याच्या विविध व्हराइटी आणि डिझाइन्स मिळतील. ब्रास ज्वेलरीचा ट्रेंन्ड आजकाल खुप आहे. त्यामुळे अशा प्रकारची ज्वेलरी आवडीने घातली जाते. जर तुम्हाला ब्लॅक आउटफिट्ससोबत परफेक्ट लूक क्रिएट करायचा असेल तर अशा प्रकारची ज्वेलरी नक्की खरेदी करू शकता.


हेही वाचा- घरीच बनवा ट्रेंडी ऑक्सिडाइज्ड बॅग्स

- Advertisment -

Manini