Sunday, December 3, 2023
घरमानिनीKitchenDiwali Recipe : रव्याचे अनारसे

Diwali Recipe : रव्याचे अनारसे

Subscribe

दिवाळीच्या फराळामधील अनारसे हा सर्वात आवडणारा गोड पदार्थ असला तरी मात्र, हा पदार्थ करणे फार कठीण आहे. परंतु, आज आम्ही तुम्हाला एका सोप्या पद्धतीने झटपट रव्याचे अनारसे कसे बनवावे ते सांगणार आहोत. जेणे करुन तुम्ही यंदाच्या दिवाळीत हे घरच्या घरी झटपट अनारसे तयार करु शकता.

साहित्य :

  • 2 वाटी रवा
  • 1 वाटी खाण्याचा डिंक
  • 2 चमचे दही
  • एक तारी साखरेचा पाक
  • 1 चमचा खसखस
  • तूप तळण्याकरता

कृती :

अनारसा | anarsa recipe | Sweets | Dessert Recipes | Tasty | Diwali Special Recipe - YouTube

  • सर्वप्रथम रवा दह्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवावा. नंतर या गोळ्यात जाडसर कुटलेला डिंक घालून सर्व सारण एकजीव करुन घ्यावे.
  • त्यानंतर नेहमीच्या अनारशासारखे अनारसे खसखसवर थापून डीप फ्राय करावे.
  • डिंक लावल्यामुळे अनारसे छान फुलण्यास मदत होते.
  • नंतर याला साखरेच्या पाकात घोळवून काढावे किंवा पाक नसेल वापरायचा तर वरून पिठीसाखर घालून खायला द्यावे.

हेही वाचा : Diwali Recipe : बेसनाचे चविष्ट लाडू

- Advertisment -

Manini