Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी दिवाळी स्पेशल रेसिपी: तीळ पापडी

दिवाळी स्पेशल रेसिपी: तीळ पापडी

Related Story

- Advertisement -

दिवाळीत आपण चिवडा, शंकरपाळी, करंजी, चकली हे पदार्थ करत असतो. पण काही वेळेला आपण वेगवेगळे पदार्थ देखील ट्राय करतो. काही लोकं तीळ पापडी दिवाळीत फराळसोबत करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तीळ पापडी कशी करतात हे सांगणार आहोत.

साहित्य

- Advertisement -

गव्हाचं पीठ – २ वाटी
रवा – १ वाटी
तीळ – अर्धीवाटी
तेल
मीठ
पाणी

कृती

- Advertisement -

सर्वप्रथम परातीमध्ये गव्हाचं पीठ, त्यात रवा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तीळ टाकायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. मग त्यामध्ये पाव वाटी कडकडीत तेल घालून ते पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तीळ पापडी खुसखुशीत होण्यासाठी मोहन व्यवस्थित करून टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकून मध्यम असं पीठ मळून घ्यायचं. मग ते १० मिनिटं झाकून ठेवायचं. १० मिनिटं झाल्यानंतर छोटं-छोटे गोळे करून त्याच्या पातळ पापड्या लाटायच्या. पापड्या लाटून झाल्यानंतर त्या २० मिनिटं ठेवून त्या तळायच्या. अशाप्रकारे तुम्ही तीळ पापडी करू शकता.

- Advertisement -