Monday, April 15, 2024
घरमानिनीसोप्या टिप्सने 'असा' करा किचनचा मेकओव्हर

सोप्या टिप्सने ‘असा’ करा किचनचा मेकओव्हर

Subscribe

तुमचे घर तुमचे व्यक्तिमत्व प्रतिबिंब करत असते. लोक घराला सुंदर लूक देण्यासाठी अनेक युक्त्या वापरतात. मात्र,घरातील इतर रूम्स सोबत किचनचीही देखभाल करणे आवश्यक असते. येथे तुम्ही घरातील अन्न शिजवत असता. अशा वेळी, सुव्यवस्थित किचन राखणे थोडे खर्चाचे असू शकते. मात्र, तुम्ही काही सोप्या टिप्सच्या मदतीने कमी बजेटमध्ये जुन्या किचनला नवीनसारखे बनवून स्वस्तात किचनचा मेकओव्हर करू शकता.

  • भांडी आणि तव्यामुळे किचेनमध्ये अनेकदा पसारा दिसून येतो. अशावेळी तुम्हाला भांडी ठेवण्यासाठी शेल्फ किंवा हँगिंग रॅक उपयोगी पडतील.
  • झाकणे, कटिंग बोर्ड किंवा बेकिंग शिटसाठी अतिरिक्त स्टोरेज वाढविण्यासाठी तुम्ही जुन्या लाकडांच्या फळ्यांचा वापर करू शकता किंवा टेन्शन रॉड्सही वापरू शकता.
  • पास्ता, मसाले किंवा तृणधान्य यासारख्या कोरड्या पदार्थांसाठी स्टोरेज कंटेनरचा वापर तुम्ही करू शकता. एकसारखे स्टोरेज कंटेनर तुमच्या किचेनचा लूक बदलून टाकतीलच शिवाय तुमचे पदार्थही खराब होणार नाहीत.
  • याव्यतिरिक्त, कंटेनरला लेबल लावा याने कोणताही पदार्थ शोधायला वेळ लागणार नाही. कंटेनर कायम मोकळ्या शेल्फवरच ठेवा.
  • किचेनमधील उघडे अन्नपदार्थ ठेवण्यासाठी तुम्ही बास्केट वापरू शकता. या बास्केटमध्ये नमकीन, मसाले, बिस्किट्स तुम्ही ठेऊ शकता. याने तुमचे किचेन ऑर्गनाईझ दिसेल.

DIY किचेन ऑर्गनायझर –

- Advertisement -
  • PVC पाईप किंवा रिकामे टिन कॅन सारख्या साहित्यांचा वापर करून तुम्ही किचेनमधील DIY ऑर्गनायझर बनविले जाऊ शकतात.
  • किचनमधील भांडी आणि गॅझेट व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही डिव्हायडर बनवू शकता. कप आणि ग्लासेस ठेवण्यासाठी हुक किंवा लाकडी बोर्ड तुम्ही बनवू शकता.
  • मसाले, औषधी वनस्पती सारख्या वस्तू ठेवण्यासाठी तुम्ही मफिन टिन वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास या टिन्सला तुम्ही रंग द्या. रंगबेरंगी टिन्समुळे तुमच्या किचनला एक वेगळा अनोखा लूक यायला मदत होईल.

रियुज आणि रिसायकल महत्वाचे –

- Advertisement -
  • फर्निचर किंवा किचेनमधील वस्तुंना पुन्हा रंग दिल्याने त्यांना नवा लूक मिळेल.
  • लाकडी कटिंग बोर्डचा वापर तुम्ही ट्रे म्हणून करू शकता.

घरच्या घरी किचनची भिंत सजवा –
बाजारात मिळणारे वॉलपेपर तुम्हाला किचेनचा लूक बदलण्यासाठी मदत करतील. स्वस्तात मस्त तुमच्या किचेनचा लूक या हॅकने बदलून जाईल.याशिवाय तुम्ही छोटे छोटे पेंटिंग्स करून सुद्धा किचनला नवीन लूक आणू शकता.

 

 


हेही वाचा : Kitchen Tips : रुचकर जेवणासाठी खास टिप्स

- Advertisment -

Manini