त्वचा सुंदर आणि निरोगी राहण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल करतात. मात्र, सतत फेशिअल केल्यामुळे चेहरा खराब होण्याची शक्यता असते. परंतु घरच्या घरी फेशिअल केल्याने चेहरा उजळण्यास मदत होते. त्यासाठी घरच्या घरी पार्लरसारखा लूक येण्यासाठी खालील स्टेप्ल फॉलो करा.
क्लिंजिंग
कोणत्याही प्रकारचे फेशिअल करताना आधी चेहऱ्यावरील तेलकटपणा हटवणे गरजेचे आहे. त्यासाठी चेहरा स्वच्छ धुवा. जर तुमच्या चेहऱ्यावर मेकअप असेल तर, चेहऱ्याला ऑईल क्लींजरने साफ करा. त्यानंतर नियमित वापरत असलेल्या फेस क्लींजरने पुन्हा एकदा क्लींजिग करा. तुम्ही फेशियल ऑइलसाठी नारळाचे तेल किंवा ऑलिव ऑइल वापरु शकता.
टोनिंग
दुसऱ्या स्टेपमध्ये क्लिंजिंग झाल्यानंतर टोनिंग करा. यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी नियमित वापरात असणारे टोनर वापरु शकता. जर तुमच्याकडे कोणतेही टोनर नसेल तर, तुम्ही नॉर्मल गुलाब पाण्याचा वापर करु शकता.
स्टीमिंग
टोनिंग झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या त्यानंतर चेहऱ्याला स्टीमिंग करावे. यासाठी पाणी गरम करुन त्याची वाफ घ्या. यामुळे चेहऱ्यावरील ऑपन पोल्स क्लिन होऊन चेहऱ्यावरील घाण निघून जाण्यास मदत होते.

स्क्रबिंग
हे स्क्रब बनवण्यासाठी ओट्सचा वापर करु शकता. ओट्स त्वचेला मऊ करण्यास मदत करते.
पध्दत :-
एका लहान वाटीत, 2 चमचे ओट्सचे पीठ आणि 1 चमचा मध एकत्र करा. त्यात 1 चमचा कोमट पाणी घाला आणि चांगले मिसळा. आता संपूर्ण चेहऱ्यावर बोटांनी स्क्रब लावा आणि एक मिनिट मसाज करा. नंतर 5 मिनिटे असेच राहू द्या. नंतर हे धुवून घ्या.
फेस मास्क
चेहरा सुंदर, चमकदार बनवण्यासाठी फेसमास्क उपयुक्त आहे.
साहित्य :
- 1 केळी
- 2 चमचे एलोवेरा जेल
- 3 चमचे बदाम तेल
पद्धत :
- एका स्वच्छ भांड्यात केळ्याचे काप घ्या आणि काट्याने मॅश करा.
- या मॅश केलेल्या केळीमध्ये एलोवेरा जेल घाला. नंतर त्यात बदामाचे तेल टाका.
- ते चांगले मिसळा आणि तुमचा पॅक तयार आहे. हा पॅक चेहऱ्यावर लावा.
- 15 मिनिटे हा चेहऱ्याला राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन टाका
मॉइस्चराइज
चेहरा धुऊन झाल्यानंतर चेहऱ्याला ताज्या एलोवेराचा गर काढून लावा.
हेही वाचा :