अलीकडे अनेकजण स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी नॉन-स्टिक भांड्यांचा वापर करतात. या भांड्यात जेवण केल्याने ते लवकर तयार होते शिवाय या भांड्यात केलेले पदार्थ भांड्याला चिटकत नाहीत. पण अनेकदा ही भांडी लवकर खराब होतात. तसेच या भांड्यांबाबत आपणही अशा काही चुका करतो. ज्यामुळे ही खराब होतात.
नॉन स्टिक भांड्यांची अशी घ्या काळजी
- सॉफ्ट स्पंजचा वापर करावा
नॉन स्टिक भांडी घासण्यासाठी हार्ड स्पंजचा वापर करू नये. ही भांडी घासण्यासाठी नेहमी सॉफ्ट स्पंजचा वापर करावा.
- जास्त उष्णता देऊ नये
नॉन-स्टिक पॅनवर जेवण बनवताना कधीही जास्त हिट वापरू नका. कारण अधिक उष्णतेमुळे कोटिंगचे नुकसान होते. तसेच हे हानिकारक टॉक्सिन सोडतात यामुळे आपल्या आरोग्यास नुकसान संभवते.
- धातूचा चमचा वापरु नका
बऱ्याचदा नॉन-स्टिक भांड्यांसोबत लाकडी चमचा दिला जातो. पण, आपण त्याचा शक्यतो वापर करत नाही. अनेकदा या भांड्यामध्ये धातूच्या चमच्याचा वापर करतात. त्यामुळे आपला नॉन-स्टिक पॅन खराब होतो. धातूच्या चमच्यांनी पॅनवर स्क्रॅच पडतात. यामुळे नॉन-स्टिक पॅनवरील कोटिंग निघून जाते. म्हणून नेहमी लाकडाच्या किंवा नॉनस्टिकसाठी मिळणाऱ्या वेगळ्या चमच्यांचा वापर करावा.
- कोमट पाणी वापरा
नॉन स्टिक पॅन साफ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. यावेळी पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर टाका जास्त गरम पाण्याचा वापर करू नका.
- भांडे गरम पाण्यात टाकू नये
कोणतेही नॉन-स्टिकचे भांडे गरम असताना थंड पाण्यात ठेऊ नये, असे केल्यास टॉक्सिन बाहेर फेकले जाते. यामुळे आरोग्यास नुकसान होते.