घरलाईफस्टाईलउन्हाळ्यात आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी करू नका 'या' पदार्थांचे सेवन

उन्हाळ्यात आजारी पडण्यापासून वाचण्यासाठी करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन

Subscribe

उन्हाळ्यातील वातावरणामुळे अनेकांना विषबाधा, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्यावर लक्ष द्यायला हवे.

उन्हाळ्यात अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. याचे कारण म्हणजे उन्हाळ्यातील कडक ऊन आणि शरीराला येणारा घाम यांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तसेच उन्हाळ्यातील वातावरणामुळे अनेकांना विषबाधा, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्यावर लक्ष द्यायला हवे.

उन्हाळ्यात आजारी पडण्यापासून कसे वाचाल?

- Advertisement -

 

- Advertisement -
  • मसालेदार पदार्थ खाणं टाळा
    उन्हाळ्यात आजारांपासून स्वतःला वाचवायचे असेल तर जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ खाऊ नये. तसेच फास्ट फूडचेही सेवन करू नये. कारण फास्ट फूड खूप वेळ बनवून ठेवलेले असतात, ज्यामुळे उन्हाळ्यात अशा पदार्थांचे सेवन केल्यास तुम्हाला विषबाधा, पोठदुखी अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
  • उन्हाळ्यात चहा, कॉफी यांचे सेवन करू नका
    उन्हाळ्यात शरीराला हाटड्रेट ठेवण खूप गरजेचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात चहा, कॉफी यांचे जास्त सेवन करू नये.
  • उन्हाळ्यात शुगर ड्रिंक्सचे सेवन करू नका
    अनेकजण उन्हाळ्यात फ्रेश वाटावं म्हणून बाजारातील शीत पेयांचे सेवन करतात. पण या ड्रिंक्समुळे कॅलरीज वाढू शकतात. याचा तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो.

  • दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नका
    उन्हाळ्यात दही आणि ताक खाणं अत्यंत चांगले असते. मात्र दूध, पनीर, क्रीम हे पदार्थ जास्त प्रमाणात गरम असतात. त्यामुळे ते पचायला कठिन असतात. यांच्या अतिरिक्त सेवनाने अपचनाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
  • मांसाहारी पदार्थांचे सेवन करू नका
    उन्हाळ्यात अंडी, मासे, मटण , चिकन यांचे जास्त सेवन करू नये. या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात उष्णता असते. त्यामुळे पोटदुखी ,मळमळ अशा समस्या उद्भवू शकतात.

 

Health Tips : ‘हे’ पदार्थ वारंवार गरम केल्यास होतात विषारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -