Saturday, April 17, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल सावधान! 'या' वस्तू करु नका दान

सावधान! ‘या’ वस्तू करु नका दान

Related Story

- Advertisement -

‘दानधर्म’ करणे आपल्या संस्कृतीमध्ये पुण्याचे मानले जाते. विशेषत: सणा-सुदीला तसेच धार्मिक कार्याच्यावेळी किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगी आपण दान करतो. हे दान कधी अन्नाचे असते तर कधी काही विशिष्ट वस्तूंचे असते. मात्र, काही विशिष्ट गोष्टी कधीच दान करू नये असं म्हणतात. कारण ‘त्या’ गोष्टी दान केल्यास आपले खूप मोठे नुकसान होते, असा समज आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

१.  जुनी झालेली पुस्तके

- Advertisement -

जुनी झालेली पुस्तकं कुणाला दान करु नये असं म्हणतात. असा समज आहे की घरातील विद्या जुन्या पुस्तकांमध्ये जतन असते. त्यामुळे जुनी पुस्तकं दान केल्यास घरातून विद्या बाहेर जाते असे समजतात.

२. घरातील झाडू

- Advertisement -

बरेच लोक घरातील झाडू किंवा केरसुणी जुनी झाल्याव, घरात काम करणाऱ्यांना अथवा अन्य कुणालतरी देऊन टाकतात. तुम्हीही असं करत असाल तर सावधान! झाडू वा केरसुणी दान केल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते आणि घरात पैसा टिकत नाही, अशी मान्यता आहे.

३. स्टीलची भांडी

काही लोकांच्या मानण्यानुसार घरातील स्टीलची भांडी वा अन्य वस्तू दान करणं अत्यंत अयोग्य असते. कारण स्टील दान केले तर घरातील सुख-शांती हरपते आणि कलह वाढतात, अशी धारणा आहे.

४. खराब वा जुने तेल

अन्नदानामध्ये अनेकदा धान्यासोबत तेलही अर्पण केले जाते. विशेषत: मंदिरामध्ये काही लोक पूजेसाठी किंवा होम-हवनासाठी तेल दान करतात. मात्र, खराब किंवा जुने झालेले तेल चुकूनही दान करु नका. असे करणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात दारिद्र्य येते असा समज आहे.

५. शिळे अन्न

भुकेल्या, गरजू माणसाला अन्नदान करणे खूप पुण्याचे काम मानले जाते. मात्र, शिळे किंवा खराब झालेले अन्न कधीच कुणाला दान करु नये. असा समज आहे, की खराब अन्न दान केल्यामुळे तुमच्या घरातील वादविवाद अधिक वाढतात. तसेच कोर्ट-कचेऱ्यांच्या कामात तुमचे मोठे आर्थिक नुकसान होते. खराब अन्न खाणाऱ्या लोकांचे तळतळाट तुम्हाला लागतात अशी मान्यता आहे.

६. धारधार वस्तू

कोणत्याही धारधार वस्तू दान करणे अयोग्य मानले जाते. कारण धार असलेल्या वस्तू दान केल्यास घरातील ताणतणावाचे प्रमाण वाढते, असा समज आहे. त्यामुळे  सुरी, ब्लेड, कोयता आदी वस्तू दान करणे टाळा.

- Advertisement -