सकाळच्या हेल्दी नाश्त्यासोबतच दुपारचे जेवण देखील परिपूर्ण आणि हेल्दी असणं महत्वाचं आहे. म्हणूनच दुपारच्या जेवणात फक्त आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. जेणेकरुन तुमचे आरोग्य उत्तम राहिल तसेच दिवसभर काम करण्याची ऊर्जा तुम्हाला मिळेल.
दुपारच्या जेवनामध्ये खाऊ नका ‘हे’ पदार्थ
- रात्रीचे जेवण
दुपारच्या जेवणात फक्त ताजे तयार केलेले अन्न खा. उरलेले अन्न खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पोट बिघडण्याची समस्या निर्माण होते.
- तळलेले पदार्थ
दुपारच्या जेवणात तळलेले अन्न कधीही खाऊ नका. दुपारचे जेवण ही अशी वेळ असते जेव्हा आपण पूर्ण आणि जड जेवण घेतो. म्हणूनच दुपारच्या जेवणात पौष्टिक पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. भाकरी, भाजी, कडधान्य, भात, कोशिंबीर खाणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्ही दही किंवा ताकही पिऊ शकता.
- सूप किंवा सॅलड
काही लोक दुपारच्या जेवणात फक्त सूप किंवा सॅलड खातात, जे चुकीचे आहे. दुपारच्या जेवणात नेहमी संतुलित आहार घ्यावा. फक्त सूप किंवा सॅलड खाल्ल्याने तुम्हाला लवकर भूक लागेल.
- फळं
दुपारच्या जेवणात फक्त फळे खाणे हा योग्य पर्याय नाही. तुम्हाला जर फळं खायची असतील तर ती केवळ सकाळी किंवा संध्याकाळी खावी.
- फास्ट फूड
दुपारच्या जेवणात पिझ्झा किंवा पास्ता यांसारखे फास्ट फूड खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचते आणि त्यामुळे तुमचे वजनही वेगाने वाढते.
हेही वाचा :