आपण घरातील प्रत्येक गोष्ट वास्तुशास्त्रप्रमाणे ठेवतो त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. बऱ्याचदा आपण घरातील शु रॅक कुठेही ठेवतो, ते सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या घरातील वास्तुशास्त्र आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी शू रॅक कुठे ठेवावा, याकडे लक्ष देणे देखील तितकेच महत्वाचे आहे. चुकीच्या ठिकाणी ठेवलेला शू रॅक नकारात्मक ऊर्जा वाढवू शकते आणि आणि घरातील समृद्धीवर परिणाम करू शकते. आज आपण जाणून घेऊयात घरात कोणत्या ठिकाणी शु रॅक ठेवावे.
मुख्य दरवाजा
मुख्य दरवाजाच्या समोर शु रॅक ठेवू नये . त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास अडथळा येतो.
स्वयंपाकघरात
स्वयंपाकघर हे खूप पवित्र ठिकाण असत या ठिकाणी तुम्ही शु रॅक ठेवू नका. अन्नपदार्थ आणि स्वच्छतेच्या दृष्टीने हे अयोग्य ठरते.
बेडरूममध्ये
बेडरूममध्ये शु रॅक ठेवल्यास घरातील शांतता आणि सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते.
बाथरूमच्या आत किंवा समोर
बाथरूमच्या आत किंवा समोर शु रॅक ठेवू नका. आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
या ठिकाणी शु रॅक ठेवा
- तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाजूला ठेवू शकता परंतु आत जाणाऱ्या दिशेत नसावा.
- लिव्हिंग रूमच्या एका कोपऱ्यात, व्यवस्थित झाकून ठेवा.
- गॅलरी किंवा व्हरांड्यात, स्वच्छ आणि व्यवस्थित ठिकाणी.
- तुमच्या घराच्या रचनेनुसार योग्य ठिकाण निवडता येईल
हेही वाचा : Laziness : पुस्तक वाचताना झोप का येते ?
Edited By : Prachi Manjrekar