घरलाईफस्टाईलउपाशीपोटी झोपू नका

उपाशीपोटी झोपू नका

Subscribe

दिवसभराच्या कामातून थकूनभागून घरी आल्यावर अनेकजण रात्री न जेवताच झोपी जातात. तर काही जण वजन कमी करणे, वजन आटोक्यात आणण्यासाठी रात्रीचे जेवण करणे टाळतात आणि उपाशीपोटीच झोपी जातात. कधीतरी उपाशीपोटी झोपणे ठीक आहे. मात्र रात्रीचे उपाशीपोटी झोपी जाणे आरोग्याच्या तक्रारींना आमंत्रण देणारे ठरू शकते.

कुपोषणाचा धोका – आपल्या शरीराला मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी ३ सारख्या पोषक घटकांची आवश्यकता असते. रात्रीचे जेवण टाळल्याने शरीराला आवश्यक पोषक घटकांची कमतरता भासू लागते. परिणामी रात्रीचे जेवण न करणार्‍या व्यक्तींमध्ये पोषक घटकांची कमतरता जाणवून कुपोषणाचा धोका उद्भवू शकतो.

- Advertisement -

चयापचय क्रियेवर परिणाम होतो – चुकीच्या खाण्याच्या पद्धती तसेच रात्रीचे जेवण न केल्याने चयापचय क्रियेवर परिणाम होतो. शरीरातील सर्वात महत्त्वाचे असलेले इन्सुलिन नामक हार्मोनवर तसेच कोलेस्ट्रॉल आणि थायरॉईडच्या शरीरातील पातळीवर रात्रीचे जेवण टाळल्याचा विपरीत परिणाम होतो.

झोपण्यात अडचण निर्माण होणे – रात्रीचे जेवण टाळल्याने संपूर्ण रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहिल्याने झोप येण्यास अडचण निर्माण होते. भुकेने व्याकुळ झाल्याने आपण गाढ झोपेला मुकू शकतो.

- Advertisement -

वजन वाढण्याची भीती – अनेकदा वाढलेले वजन आटोक्यात आणण्यासाठी एक वेळचे जेवण बंद ठेवावे. अनेक जण रात्रीचे जेवण करणे टाळतात. रात्री कमी खाणे चांगली सवय असली तरी जेवण पूर्णपणे टाळणे वजन वाढण्याच्या धोक्याला आमंत्रण देणारे ठरू शकते. आपले शरीर साठलेल्या फॅट्सचा कालांतराने इतर शारीरिक श्रम करताना उपयोग करतो. परिणामी वजन कमी होण्यापेक्षा वाढण्याची भीती वाढते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -