तरुण दिसण्यासाठी सगळेजण धडपड करत असतात. अशातच तरुण दिसण्यासाठी फक्त कॉस्मॅटिक गोष्टी कमी पडत नाहीत. तर आपल्याला प्रत्येकाला परफेक्ट आहाराची गरज असते. महत्वाचे म्हणजे आरोग्याला ठराविक वेळी ठराविक अन्नाची गरज असते. जे आपण अन्न खातो त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.
जर हे अन्न योग्य वेळी खाल्ले नाही तर त्याची कमतरता आपल्या शरीरामध्ये राहते. यामुळे हे सगळं चेहऱ्यावर दिसून येत. आणि म्हणूनच कमी वयात देखील आपण जास्त वयाचे का दिसतो ? तर याचे नेमके कारण म्हणजे वेळेवर न होणार आहार.

कोणत्या आहाराचे सेवन करायला पाहिजे हे जाणून घेऊया-
- भाज्या आणि फळांमधे ‘क’ जीवनसत्त्व असतं.
- ‘क’ जीवनसत्त्वामुळे त्वचेचं आरोग्य सांभाळणाऱ्या कोलॅजनची निर्मिती होते.
- त्यामुळे त्वचेचं आरोग्य जपायचं असेल तर फळं आणि भाज्या यांचं सेवन आवश्यक आहे.
- दिवसातून एकदा तरी बदाम, अक्रोड, जवस, चिआ सीडस यांचं सेवन करावं.
- त्वचेला सेलेनिअम, ओमेगा ३, ओमेगा ६ सारखे अत्यावश्यक फॅटी अॅसिडस मिळतात.
- फॅटी अॅसिडमुळे कोलॅजनची निर्मिती होते.
- त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाही.
- कच्च्या भाज्या सॅलेड स्वरुपात खाव्यात.
- यातून तंतुमय घटक शरीरात जातात. यामुळे पोट साफ राहातं.
- महिलांच्या हार्मोनल असंतुलन हे त्यांच्या आहारावर खूप अवलंबून असतं.
- त्यामुळे आहारात पोषक तत्वे असणे फार गरजेचे आहे.
हेही वाचा :
वयाच्या चाळीशीनंतर ही होऊ शकता आई-बाबा
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -