Sunday, March 16, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : मासिक पाळी दरम्यान पेनकिलरऐवजी करा हे घरगुती उपाय

Health Tips : मासिक पाळी दरम्यान पेनकिलरऐवजी करा हे घरगुती उपाय

Subscribe

मासिक पाळी दरम्यान प्रत्येक महिलेला असह्य वेदना होतात. हा काळ प्रत्येक महिलेसाठी खूप कठीण असतो. मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही महिलांना ओटीपोटात वेदना होतात, तर काहींना पाठदुखी किंवा पाय दुखणे, हा त्रास कमी करण्यासाठी बऱ्याच महिला पेनकिलरची मदत घेतात. या पेनकिलरने तुम्हाला तात्पुरते बरे वाटते परंतु भविष्यात पेनकिलरच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. या समस्या उद्भवू नये यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकतात. आज आपण जाणून घेऊयात मासिक पाळी दरम्यान पेनकिलरऐवजी कोणते घरगुती उपाय केले पाहिजे.

 तेल लावा

मासिक पाळी दरम्यान महिलांना अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. अशावेळी ओटीपोटाला तेल लावल्याने आराम मिळतो. नारळाच्या तेलामध्ये अँटी-इंफ्लेमेटरीचे गुणधर्म असतात. पाळीच्या दरम्यान नारळाचे तेल उत्तम आहे.

गरम पाण्याची पिशवी

पोटावर गरम पाण्याची पिशवी ठेवल्याने स्नायूंना आराम मिळते. तसेच रक्तप्रवाह देखील कमी होतो. ओटीपोटातील वेदना कमी होतात.

तुळशीची पाने

तुळशीमध्ये नैसर्गिक अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. पाळीच्यावेळी तुळशीच्या पानांचा काढा बनवून पिणे हे आपल्या आरोग्यसाठी चांगले असते.

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे पाण्यात भिजवून त्याचा काढा प्यायल्यास स्नायूंना आराम मिळते. तसेच पाठदुखी किंवा पाय दुखणे त्वरित थांबते.

योगा

बऱ्याच महिला पाळीच्यावेळी व्यायाम करत नाही. या दरम्यान असह्य वेदना होत असल्याने व्यायाम करणे किंवा योगा करणे अवघड जाते. परंतु काही वेळ योगा केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होतात. हलक्या स्ट्रेचिंग व्यायामामुळे रक्तप्रवाह सुधारतो, आणि स्नायूंना आराम मिळतो.

झोप आणि विश्रांती

पाळीच्यावेळी पुरेशी झोप आणि विश्रांती घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीराला आराम दिल्याने वेदना कमी होऊ लागतात. रक्तप्रवाह देखील कमी होते.

हेही वाचा : Hair Care Tips: या टिप्सने बदलत्या ऋतूमध्ये केस गळती थांबेल


Edited by : Prachi Manjrekar

 

 

 

 

Manini