Friday, February 23, 2024
घरमानिनीओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

ओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Subscribe

विविध कारणांमुळे ओठ काळसर दिसतात. यामागे प्रामुख्याने केमिकलयुक्त कॉस्मेटिक्सचा वापर, स्मोकिंग, टॅनिंग ही कारणं देखील असतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, ओठांची त्वचा पातळ आणि नाजूक असते. त्यामुळे ते सतत कोरडे होतात आणि त्यामुळेच फाटतात. अशावेळी ओठ काळे दिसू लागतात. कधी-कधी वरचा ओठ खालच्या ओठांच्या तुलनेत अधिक काळसर दिसतात.

ओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

- Advertisement -

  • ओठ सुंदर आणि गुलाबी दिसण्यासाठी ग्लॉसी लिपस्टिक आणि लिप बामचा वापर करा.
  • लिपस्टिक काढण्यासाठी क्रीम किंवा जेलचा वापर करा. तसेच रात्री बदामाचे तेल लावून मालिश करा.
  • काळ्या ओठांना स्क्रब करा त्यासाठी जैतून तेल, लिंबाचा रस आणि साखरेचा वापर करा.
  • ओठांना लालसर पणा आण्यासाठी बीटाच्या रसाचा वापर करा.
  • दिवसातून एकदा ओठांना दुधाची मलाई लावून मालिश करा.
  • ओठ काळसर होऊ नये म्हणून त्यावर खराब, केमिकलयुक्त लिपस्टिक वापरु नका.
  • जुन्या लिपस्टिकचा वापर करणं टाळा.
  • नवीन लिपस्टिक खरेदी करताना ती योग्य तपासून घ्या.
  • शक्यतो हर्बल लिपस्टिकचा वापर करा.

हेही वाचा :

‘या’ 6 भाज्या आहेत व्हिटॅमिन सी चा खजिना

- Advertisment -

Manini