अलीकडच्या धावपळीच्या जीवनात अनेक व्यक्तींना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. मानसिक तणावामुळे शारीरिक समस्या देखील उद्भवतात. मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपचार केले जातात. ज्योतिष शास्त्रातील काही उपाय केल्याने देखील तुम्ही तुमचा मानसिक तणाव सहज दूर करु शकता.
तणाव दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय
- ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राला मनाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात चंद्र ग्रह अशुभ स्थित आहे त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. यासाठी तुम्ही चंद्र मंत्राचा जप करु शकता.
- चंद्राचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही मोती रत्न धारण करु शकता. मात्र, त्याआधी ज्योतिषांचा सल्ला घ्या.
- प्रत्येक सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिवपिंडीवर दूध आणि पाणी अर्पण करा यामुळे देखील मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते.
- जर तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागत असेल तर दररोज तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा.
- तसेच रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि राहू ग्रहाचा अशुभ प्रभाव कमी होतो. रोज संध्याकाळी तुळशीजवळ 11 वेळा श्री विष्णू मंत्र म्हणा.
- Advertisement -
हेही वाचा :
- Advertisement -
- Advertisement -