Saturday, February 24, 2024
घरमानिनीHealthसंपूर्ण दिवस उत्साहात जावा यासाठी सकाळी उठल्यावर करा 'या' गोष्टी

संपूर्ण दिवस उत्साहात जावा यासाठी सकाळी उठल्यावर करा ‘या’ गोष्टी

Subscribe

दिवसाची सुरुवात चांगली झाली की संपूर्ण दिवस चांगला जातो. त्यामुळे आपल्या सकाळची सुरुवात काहीतरी चांगल्या गोष्टी करुन करावी. जेणेकरुन दिवस आनंदी जाईल. परंतु आपल्यापैकी अनेकजण सकाळी उशिरा उठतात, मोबाईलवर वेळ घालवतात, चिडचिड करतात. ज्यामुळे त्यांचा दिवस खराब जातो. तज्ञांच्या मते, सकाळी उठल्या उठल्या मोबाईल, टिव्ही पाहण्यापेक्षा काहीतरी चांगल्या गोष्टी कराव्या ज्यामुळे आपला संपूर्ण दिवस उत्साहात जाईल.

सकाळी उठल्यावर करा या गोष्टी

  • सूर्यप्रकाशात फिरा

მზებუდობა – ყველაფერი, რაც წლის ამ სასწაული დღის შესახებ უნდა იცოდეთ –  megatv.ge

- Advertisement -

सकाळी लवकर उठून नेहमी सकाळ्या कोवळ्या उन्हान फिरावं. कोवळ्या उन्हातून आपल्या शरीराला व्हिटॅमिन-डी मिळतो. यामुळे आपले आरोग्य देखील उत्तम राहते.

  • व्यायाम

Benefits of exercise: 10 health problems that workout can prevent |  HealthShots

- Advertisement -

व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स वाढवण्यास मदत होऊ शकते. चालणे, हाय- इंटेंसिटी ट्रेनिंग, जॉगिंग, सायकलिंग, हायकिंग यामुळे शरीरात हॅप्पी हार्मोन्स वाढतात. यामुळे तुमची व्हिटॅमिन डी पातळी देखील वाढू शकते.

  • मेडिटेशन करणे

Meditation for Sleep | How to Sleep better with Meditation

व्यायामानंतर तुम्ही काही मेडिटेशन देखील करु शकता. यामुळे आपले मन एकाग्र होण्यास मदत होते. मेडिटेशनमुळे आपले मन नेहमी सकारात्मक विचार करते. जे आपल्या आयुष्यासाठी खूप फायदेशीर आहे.

  • नृत्य करणे

Morning Dance | Chicago | Ken Koskela Photography

नृत्य हा व्यायामाचाच एक भाग आहे. नृत्यातूनही तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. यामुळे मानसिक ताण, चिंता, दुःख विसरुन जाण्यास मदत होते.

  • सकारात्मक गाणी ऐकणे

The science behind why music makes us feel good | Psychologies
गाणी ऐकायला सर्वांनाच आवडतात. पण नेहमी सकारात्मक गाणी ऐकणं फायदेशीर असतं. यामध्ये तुम्ही भक्तीगीत देखील ऐकू शकता.


हेही वाचा :

रूट कॅनलच्या दुखण्यापासून अशी मिळवा सुटका

- Advertisment -

Manini