घर लाईफस्टाईल तणावमुक्तीसाठी करा 'ही' योगासने...

तणावमुक्तीसाठी करा ‘ही’ योगासने…

Subscribe

योगासन हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असून या मुळे आपल्या मनावर नियंत्रण राहते. सध्याचे युग धावपळीचे आहे. मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांनी अनेकांना घेरले आहे. तसेच ताण-तणावावर मात करण्यासाठी आवश्यक ठरणारे योगा हे शरीरासाठी उत्तम आहेत. अनेकवेळा व्यायामाचा अभाव, चुकीचा आहार, आहाराच्या चुकीच्या वेळा यामुळे त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

भुजंगासन

या योगासनामध्ये पोटावर झोपून, हात छातीजवळ टेकून, पोटापर्यंत शरीर मागे उचलणे. मान वर उचलून मागेपर्यंत घेणे ही कृती. मुख्य संबंध पाठीच्या कण्याशी व पोटाच्या स्नायूंशी असते. पोटाच्या स्नायूंवरील ताण हा पचनेंद्रियांवर योग्य परिणाम करतात. यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. पाठदुखी वा पाठीच्या कण्याच्याचुकीच्या हालचालीवर भुजंगासन केल्यास पाठीला आराम मिळतो.

- Advertisement -

Bhujangasana: 5 Reasons Why You Should Add Cobra Pose In Your Daily Routine

शलभासन

हे योगासन करताना या आसनातील ताण हा विशेषेकरून पाठीच्या मणक्यावर आणि ओटीपोटातील स्नायू व मांडीतील स्नायू यावर येतो. त्यामुळे त्या स्नायूंची कार्यक्षमता वाढते. तसेच हे केल्यावर लहान व मोठे आतडे यांवरही ताण पडून स्नायूंची अधिक हालचाल होते आणि यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

- Advertisement -

आज का योग:शलभासन का नियमित अभ्यास इस समस्याओं में है काफी फायदेमंद, क्या आप  जानते हैं? - Aaj Ka Yog Body Will Be Flexible Waist Strong With Shalbhasan  - Amar Ujala Hindi

धनुरासन

धनुरासनात केल्याने शरीराच्या सर्वच भागावर ताण येतो. त्यामुळे शरीर हलके होते. तसेच पोट, मांड्या, पाय, दंड व हात यावरही ताण येतो. अशामुळे पोटावर पडणाऱ्या सर्वाधिक दाबाने पोटातील इंद्रिये सुरळीतपणे कार्य करतात. महत्वाचे म्हणजे धनुरासन करताना हाता-पायांतील शिरा ताणल्यामुळे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते.

Malaika Arora nailing Dhanurasana in new Instagram post is the perfect  Monday motivation - India Today

मत्स्यासन

मत्स्यासन या आसनामुळे पोटाला योग्य ताण पडतो. अशातच त्यावेळी ताणलेल्या ग्रंथी मोकळ्या होतात. तसेच मेंदूला अधिक चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होतो. ज्यामुळे मेंदूला चालना मिळते. अशक्तपणा आणि चक्कर अशा समस्या येत नाहीत. शरीरातील ब्लड प्रेशर व्यवस्थित राहते. यामुळे चिडचिड होत नाही. तर हे केल्यामुळे एकाग्रता वाढते.

Matsyasana, The Fish Pose: An Incredible Yoga Posture for Your Back Issues  - NDTV Food

हलासन

हलासन करताना पाठीचा कणा हा ताणला जातो. तसेच त्याला लवचिकता येते. हे करत असताना कमरेपासून पायापर्यंतच्या स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे शरीरातील नसा यांचा रक्तपुरवठा चांगला राहतो. अशातच पोटाचे स्नायू व त्यातील इंद्रिये यांची कार्यक्षमता वाढते. आणि यामुळे पचन चांगले होते. तसेच हे नियमित केल्याने आरोग्य सदृढ राहते.

How to Do Halasana (Plow Pose) Steps & Benefits | The Art of Living India


 

हेही वाचा :

सांधे आणि अंगठ्यात जमा झालेले Uric Acid ‘या’ गोष्टींनी होईल दूर

- Advertisment -