Sunday, February 11, 2024
घरमानिनीHealthसर्दी, खोकला, इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी थंडीत 'हे' नियमित करा

सर्दी, खोकला, इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी थंडीत ‘हे’ नियमित करा

Subscribe

हिवाळ्यात थंडीचा कडाका कमी जास्त होत असतो. त्यामुळे बऱ्याचदा अनेकांना सर्दी, खोकला, ताप, इन्फेंक्शन होते. थंडीमुळे शरीरातील नसा आकडतात. त्यामुळे बऱ्याचदा रक्तप्रवाह होण्यास अडचण येते. त्यामुळे थंडीच्या दिवसात अनेक आजारांचा आपल्याला सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आजारांपासून आपले संरक्षण करण्यासाठी काही महत्वाचे उपाय करणं गरजेचं आहे.

थंडीत आजारांपासून असे करा संरक्षण

  • आहार

Winter: 9 foods to keep your body warm and cosy | HealthShots

- Advertisement -

हिवाळ्याच्या दिवसात सतत भूक लागते. त्यामुळे तेलकट पदार्थांचे जास्त सेवन केले जाते. सर्दी, खोकल्यासारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. योग्य, संतुलित आहाराचे सेवन करा. आहारामध्ये धान्य, अंडी, मासे, फळे यांचा समावेश करा. मसाल्यांचा जेवणात वापर करा. योग्य आहाराचे सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मोठी मदत होते.

  • भरपूर पाणी प्या

5 benefits of drinking water in the morning

- Advertisement -

सतत पाणी प्यायल्याने शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने शरीरातील पोषक पदार्थ शरीरात एकजीव होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

  • व्यायाम

Exam preparations made easy: 5 quick exercise tips to remain fit while  studying | Competitive Exams - Hindustan Times

थंडीच्या दिवसात आजारांपासून दूर रहायचे असल्यास नियमित व्यायाम करा. योगा करा. नियमित व्यायाम केल्याने शरीरातील कॅलरी बर्न होतात. शरीर उष्ण राहण्यास मदत होते. शरीरात उष्णता निर्माण झाल्याने सर्दी, खोकला सारखे आजरांपासून आपले संरक्षण होईल.

  • स्वच्छता राखा

Our Products – Diamond Clean Oman

थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा. नियमित साबण आणि पाण्याने आपले हात, पाय स्वच्छ धुवा. सतत डोळे, नाक,चेहऱ्याला हात लावू नका. स्वत:ला बॅक्टेरिया आणि किटाणूंपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • योग्य झोप

17 Proven Tips to Sleep Better at Night

थंडीच्या दिवसात योग्य आहार , व्यायामाबरोबर योग्य झोप घेणेही गरजेचे आहे. योग्य झोप न घेतल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते.


हेही वाचा :

‘या’ समस्या असणाऱ्यांनी पिऊ नये हळदीचे दूध

- Advertisment -

Manini