Saturday, December 9, 2023
घरमानिनीBeautyथंडीत होणाऱ्या कोंड्यापासून 'असे' करा केसांचे संरक्षण

थंडीत होणाऱ्या कोंड्यापासून ‘असे’ करा केसांचे संरक्षण

Subscribe

हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घेणं खूप महत्वाचे असतं. थंड हवामानात केस रुक्ष होतात तसेच केसात कोंडा होण्याची समस्या देखील वाढते. यामुळे हळूहळू ही समस्या केसांची मुळं कमकुवत करते आणि लहान वयातच केस गळण्याची समस्या निर्माण होते. हिवाळ्यामध्येही केस उत्तम आणि चमकदार राहण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.

Glycolic Acid for Dandruff | How It Works & Best Products

- Advertisement -
  • तेलाने मसाज करा

आठवड्यातून एकदा नारळाचे तेल किंवा बदामाच्या तेलाने डोक्याला मालिश करा. यामुळे डोक्यातील रक्त पुरवठा सुधारेल. तसेच केसांचा कोरडेपणा दूर होईल आणि हिवाळ्याच्या काळातही केस निरोगी राहतील.

  • हेअर ट्रिमिंग

हिवाळ्यातील हंगामात केस ट्रिम करणे देखील एक चांगला पर्याय आहे. हिवाळ्यातील वातावरणामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे केस तुटणे, गळणे अशा समस्या वाढण्याची शक्यता असते. ट्रिमिंग करून आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे यावर ट्रिमिंग हा उत्तम पर्याय आहे.

- Advertisement -

6 Things to Know if You're Dealing with Dandruff | Women's Health

 

  • रोज केस धुणं टाळा

टाळूची त्वचा मॉइश्चराइझ राहावी, यासाठी आपल्या केसांमधून नैसर्गिकरित्या तेलाचा स्त्राव होतो. याच कारणामुळे केस धुतल्यानंतर 2 ते 3 दिवसांनंतर तेलकट होतात. केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे तेल महत्त्वाची भूमिका निभावतात. नियमित हेअरवॉशमुळे केसांमधील नैसर्गिक ओलाव्यावर वाईट परिणाम होतो. केसांवरील नैसर्गिक चमक नाहीशी होते. केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. यासाठी दररोज केस धुणे टाळावे.

  • केसांना स्कार्फने झाका

हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये केस शक्य तितके झाकून ठेवल्याने केसाचे आरोग्य उत्तम राहते. अन्यथा केस कोरडे होऊ शकतात. हिवाळ्यात केस ड्राय होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाहेर जातांना केसांना स्कार्फने झाकून बाहेर पडावे. हिवाळ्यात केसांना जास्त स्प्लिटस पडतात. त्यामुळे अधुन मधून केसांना ट्रीम करत राहा. म्हणजे केस हेल्दी राहतील.

 


हेही वाचा :

हेअर कलर मुळे केस ड्राय झालेत,मग करा हे उपाय

- Advertisment -

Manini