पावसाळ्यात आपल्याला गरमागरम चटपटीत पदार्थ खायची खूप इच्छा होती. मात्र वारंवार तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. आपल्यापैकी अनेकांना समोसा खायला खूप आवडतो. मात्र प्रत्येकवेळी आपण बटाट्याचा समोसा खातो, पण या वेळी तुम्ही मूग डाळीचा चविष्ट आणि पौष्टिक समोसा नक्की ट्राय करा.
साहित्य :
- 2 कप मैदा
- 3 कप मूग डाळ(भिजलेली)
- 3 चमचे गरम मसाला
- हींग आवश्यकतेनुसार
- 3 चमचे लाल मिरची पावडर
- 2 चमचा धना पावडर
- जिरे
- मीठ चवीनुसार
- तेल
कृती :
- सर्वप्रथम मैद्यामध्ये तेल आणि मीठ टाकून कणीक मळून घ्या.
- त्यानंतर सारण तयार करण्यासाठी भिजवलेली मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये जीरे, गरम मसाला, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, धना पावडर, मीठ चवीनुसार आणि बारीक केलेली मूगडाळ एकजीव करून परतून घ्या.
- हे मिश्रण थंड झाल्यावर एकीकडे कणकेची बारीक पुरी लाटून घ्या आणि त्या पुरीचे मधून दोन भाग करा.
- या अर्ध्या भागात तयार सारण भरून त्याला समोश्यासारखा आकार द्या आणि हे तेलात खरपूस तळून घ्या.
- तयार मूग डाळीचे समोसे सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा
हेही वाचा :
Mirchi Masala : असा बनवा घाटी स्टाईल मिरची मसाला
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -