आपल्यापैकी अनेकजण फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी वर्कआउट करतात. अनेकजण व्यायाम केल्यानंतर प्रोटीन शेक देखील पितात, ज्यामुळे त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. परंतु हे शरीरासाठी खरंच फायदेशीर आहे का? हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, असे सप्लिमेंट्स शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतात.
- शरीराला प्रोटीन मिळविण्यासाठी मांस, मासे, अंडी, दूध, कडधान्ये आणि सोयाबीन खाण्यास सांगितले जाते. परंतु प्रोटीन शेक हा या पोषक घटकासाठी योग्य पर्याय नाही कारण यामुळे पोषक घटकांची रचना बदलते.
- प्रोटीन शेकमुळे पोटाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. कारण त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनसंस्था बिघडू शकते.
- व्यायामानंतर प्रोटीन पावडर प्यायल्याने इन्सुलिनची पातळी वाढू शकते
- अनेकदा काहीजण पैसे वाचवण्यासाठी स्वस्त आणि कमी दर्जाचे प्रोटीन शेक पितात. परंतु त्यात पारा, आर्सेनिक, कॅडमियम आणि शिसे यासारख्या हानिकारक गोष्टी आढळतात. यामुळे थकवा, अशक्तपणा आणि डोकेदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.