घरलाईफस्टाईलतुम्ही सुद्धा दिवसातून 5 ते 6 कप चहा पिता का? मग...

तुम्ही सुद्धा दिवसातून 5 ते 6 कप चहा पिता का? मग तुम्हालाही भोगावे लागतील ‘हे’ गंभीर परिणाम

Subscribe

चहाप्रेमी दिवसातून कमीत कमी 5 ते 6 वेळा चहा पितात. परंतु तुम्हाला माहित आहे का दिवसातून जास्त चहा पिणं शरीरासाठी खूप घातक आहे.

अनेकजण आपल्या सकाळची सुरूवात चहा पिऊन करतात. अनेक लोक दिवसातून अनेकवेळी चहा पिणं पसंत करतात. दिवस असो किंवा रात्र कोणत्याही वेळ हे लोक चहाला नाही म्हणत नाहीत. असे चहाप्रेमी दिवसातून कमीत कमी 5 ते 6 वेळा चहा पितात. परंतु तुम्हाला माहित आहे का दिवसातून जास्त चहा पिणं शरीरासाठी खूप घातक आहे.

जास्त चहा प्यायल्याने होतं नुकसान
जर तुम्ही दिवसभरामध्ये खूप चहा पित असाल तर तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दिवसातून 5 ते 6 कप चहा प्यायल्याने शरीरामध्ये डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. या शिवाय चहा जास्त प्यायल्याने तुमच्या शरीरातील हाडं कम़जोर होऊ शकतात. चहामध्ये कॅफीन जास्त प्रमाणात आढळतं. त्यामुळे त्याला जास्त प्रमाणात प्यायल्याने तणाव निर्माण होतो. तसेच सतत चहा प्यायल्याने शरीरामध्ये आयरन देखील कमी होते.

- Advertisement -

एक्सपर्ट्सच्या मते, एका दिवसामध्ये चार कप चहा प्यायल्याने अनेक प्रकारचे नुकसान भोगावे लागू शकतात. चहामध्ये असलेले कॅफीनमुळे तुम्हाला जळजळल्यासारखे वाटू शकते. तसेच चहामुळे तुम्हाला निद्रानाश देखील होऊ शकतो. शिवाय इतर अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

- Advertisement -

पूर्ण दिवसात किती कप चहा प्यावा?
तुम्ही कितीही चहाप्रेमी असाल तरीही तुम्हाला तुमच्या शरीरासाठी दिवसातून केवळ दोन कप चहा प्यायला हवा. चहापावडर आणि साखरेच्या चहामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. परंतु जर तुम्हाला सर्दी-खोकला झाला असेल तर अशावेळी आल्याचा चहा आवर्जून प्यायला हवा.


हेही वाचा : 

वर्षभर मसाले टिकण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -