घरलाईफस्टाईलतुम्हालाही रात्री उशिरा भूक लागते का? तर खा 'हे' पदार्थ

तुम्हालाही रात्री उशिरा भूक लागते का? तर खा ‘हे’ पदार्थ

Subscribe

रात्री अपरात्री बऱ्याचदा आपण नको ते पदार्थ खातो. मात्र त्याने आपले वजन वाढते.

दिवसभर कितीही खाल्ले तरी रात्री तरी बऱ्याच जणांना रात्री उशिरा भूक लागते. मात्र उशिरा भूक लागल्यावर काय खायचे हा प्रश्न पडतो. आपण हेल्दी राहण्यासाठी अनेकदा डाएट प्लॉन बनवतो. रात्री उशिरा खाल्ल्याने तयार केलेला सगळा डाएट प्लॉन फसतो. मात्र भूकेच्या मागे काहीच दिसत नाही. रात्री अपरात्री बऱ्याचदा आपण नको ते पदार्थ खातो. मात्र त्याने आपले वजन वाढते. मध्यरात्री भूक लागल्यावर काही हेल्दी खाण्यासाठी मिळाले तर भूकही पूर्ण होईल आणि मध्यरात्री हेल्दी पदार्थ आपल्या पोटात जाईल.

नाचणीचे पापड

- Advertisement -

रात्री उशिरा भूक लागल्यास नाचणीचे पापड खा. नाचणीचे पापड आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. फक्त हे नाचणीचे पापड भाजलेले असतील याची काळजी घ्या. नाचणीच्या पापडाने आपल्या शरिरात हेल्दी पदार्थ जातात आणि आपली भूकही भागते.

फळे

- Advertisement -

मध्यरात्री जर अचानक भूक लागली तर फळे खाणे कधीही उत्तम. कोणत्याही तेलकट पदार्थांपेक्षा फळे खाणे आपल्या शरिरारासाठी आणि भूकेसाठी फायदेशीर ठरते.

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी कधीही उत्तम. ड्रायफ्रूटमध्ये प्रोटीन, फायबर असते ज्यामुळे आपल्या शरिराला आवश्यक असलेले प्रोटीन मिळतात. रात्री जर भूक लागली तर बदाम, काजू,बेदाणे ही खाऊ शकता.

मखाणा


मखाणा हा पदार्थ तयार करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. मंद गॅसवर मखाणा भाजून तुम्ही खाऊ शकता. रात्री भूक लागल्यास मखाणा तुमची भूक भागवू शकतो.


हेही वाचा – WhatsApp ची प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारावीच लागणार, नाहीतर…­­­­­­­­­­­­­­­­­­­­

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -