Eco friendly bappa Competition
घर लाईफस्टाईल तुम्हांलाही सतत शिंका येतात का? या पाच घरगुती उपचारांनी मिळेल आराम

तुम्हांलाही सतत शिंका येतात का? या पाच घरगुती उपचारांनी मिळेल आराम

Subscribe

बदलत्या वातावरणामुळे काही लोकांना जास्त शिंका यायला लागतात. सतत शिंक येत असल्याने अनेक लोकं या समस्येला त्रासले आहेत. काहीनां एलर्जी असल्यामुळे शिंका येतात. जसे की धूळ, प्रदुषण, अती सुगंध, भाज्या व फुलांचा वासाची एलर्जी. जेव्हा आपले शरीर एखाद्या गोष्टीला घेऊन ओवर-रिऐक्ट करत यालाच ऐलर्जी म्हणतात. शिंक येणे हि वाईट सवय नाही. याउलट शिंकल्यावर जंतू, वायरस आपल्या शरीरात प्रवेश करण्याआधीच बाहेत पडतात. अनेकदा सतत आलेल्या शिंकामुळे तुम्ही त्रासग्रस्त होता. वातावरणाच्या बदलावामुळे तुम्ही जर या समस्येत असाल तर हे उपाय नक्की करून पहा.

आल्याचे सेवन
आल्याच रस काढून त्यात अर्धा चमच्यात थोडे मध घ्या आणि त्याचे सेवन करा. दिवसातून ३-४ वेळा याचे सेवन केल्यास, तुम्हाला याचा परिणाम लवकरच जाणवेल.

- Advertisement -

मोठ्या वेलाचीच उपयोग
मोठ्या वेलचीचा उपयोग जेवणाच स्वाद वाढवण्यासाठी केला जातो. त्याच बरोबर मोठी वेलची हि घरगुती औषध उपचारांनासाठी देखील वापरली जाऊ शकते. मोठी वेलची तोंडात ठेवुन सतत चगळत राहिल्याने शिंकेचे प्रमाण कमी होते.

आवळ्याचे सेवन
आवळा मध्ये विटामिन-सीचे प्रमाण जास्त असल्याने,एंटी-ऑक्सीडेंट्स आणि एंटी-बैक्टीरियलच्या गुणांनी भरलेला आवळा आपल्या शरिरातील रोग प्रतिकार क्षक्ती वाढवत. आवळ्याचे ज्युस किंवा त्याचे असेच सेवन केल्याने तुमच्या शिंका कमी होण्यात मदत होईल.

- Advertisement -

बडिशेप
बडिशेप खायला सर्वांना आवडते. विशेषत: जेवल्यावर माउथ-फ्रशनर म्हणून बडीशेप खाल्ली जाते. बडिशेपच्या बियांनमध्ये असे गुण आहेत, ज्यामुळे तुमच्या शिंका कमी होऊ शकतात.

लिंबूवर्गीय फळे
जर तुम्हाला वारंवार शिंका येत असतील तर तुमच्या आहारात निश्चितच लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा. संत्री, लिंबू, द्राक्षे यांसारख्या फळांना लिंबूवर्गीय फळे म्हणतात, कारण त्यात भरपूर व्हिटॅमिन-सी असते. याचे सेवन केल्याने तुम्हाच्या शिंका कमी झाल्याच जणवेल.

- Advertisment -