Health Tips : तुम्ही सुद्धा उभं राहून पाणी पिता का? आजच व्हा सावधान नाहीतर होतील ‘हे’ आजार

आजकाल धावपळीच्या काळात अनेकजण घाईगडबडीत उभ्याने जेवतात किंवा उभ्यानेच पाणी पितात. पण तुम्हाला माहित आहे का? उभं राहून पाणी पिणं तुमच्या शरीरासाठी खूप घातक ठरू शकते. आतापर्यंत तुम्ही पाणी पिण्याचे अनेक फायदे ऐकले असतील परंतु पाणी कसं प्यावं. याबाबत अनेकांना माहित नाही.

उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान

 • गुडघे दुखी
  उभं राहून पाणी पिल्याने तुम्हाला गुडघे दुखीचा त्रास होऊ शकतो. कारण जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता तेव्हा ते पाणी गुडघ्यापर्यंत पोहोचते आणि ते तिथेच जमा होते. ज्यामुळे तुमच्या गुडघ्याच्या हाडावर त्याचा परिणाम होतो. शिवाय शरीरातील इतर अवयवांवर देखील त्याचा वाईट परिणाम होतो.
 • हर्नियाची समस्या निर्माण होऊ शकते
  उभं राहून पाणी पिल्याने तुमच्या शरीरात हार्नियाचा त्रास उद्भवू शकतो. उभं राहून पाणी पिल्याने पोटाच्या खालच्या भागात त्याचा दबाव पडतो. यामुळे पोटाच्या आसपासच्या भागावर त्याचा वाईट परिणाम होतो.
 • किडनीवर होईल परिणाम
  उभं राहून पाणी पिल्याने पाणी फिल्टर न होता सरळ पोटाच्या खालील बाजूस जाते. यामुळे पाण्यातील अशुद्ध घटक शरीरातील पित्ताशयात जमा होण्याचा धोका निर्माण होतो. जे किडनीसाठी खूप घातक सिद्ध होते.
 • शरीरातून अॅसिड बाहेर पडत नाही
  शरीरात अॅसिड तयार होणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु उभं राहून पाणी पिल्याने अॅसिड शरीरातून बाहेर पडू शकत नाही. शरीरातील अॅसिडचा स्तर कमी होत नाही. मात्र बसून हळू हळू पाणी पिल्याने शरीरातील खराब अॅसिड बाहेर पडते आणि त्यामुळे शरीरात अॅसिडचे प्रमाण सुद्धा वाढत नाही.
 • अपचनाची समस्या
  उभे राहून पाणी पिल्याने अपचनाची समस्या सुद्धा निर्माण होते. खरंतर जेव्हा पाणी बसून पितो तेव्हा शरीरातील मसल्स रिलाक्स होतात. सोबतचं पाणी योग्य पद्धतीने पचून शरीरातील सगळ्या सेल्सपर्यंत पोहोचते.

 


हेही वाचा :Health Tips : प्रसूतीनंतर महिलांनी खिचडी का खावी?