Thursday, March 20, 2025
HomeमानिनीHealth Tips : तुम्हीही देवपूजेत अगरबत्ती लावता का ?

Health Tips : तुम्हीही देवपूजेत अगरबत्ती लावता का ?

Subscribe

अगरबत्ती लावणे ही अनेक घरांमध्ये धार्मिक, आध्यात्मिक मानसिक शांतीसाठी आणि सुवासासाठी केली जाणारी पारंपरिक प्रथा आहे. परंतु वारंवार अगरबत्ती जाळल्याने आरोग्यावर आणि पर्यावरणावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. अगरबत्तीच्या धुरामुळे हवेची गुणवत्ता बिघडू शकते आणि त्यातील काही रसायने श्वसनसंस्थेसाठी हानिकारक ठरू शकतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दमा किंवा ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी हा धूर त्रासदायक ठरू शकतो. काही संभाव्य तोटेही आहेत, विशेषतः आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या दृष्टीने.

श्वसनासंबंधी त्रास

अगरबत्तीच्या धुरामध्ये कार्बन मोनोऑक्साइड, बेंझीन, आणि फॉर्मल्डिहाइड यांसारखे हानिकारक घटक असतात, जे फुफ्फुसांसाठी हानिकारक ठरू शकतात. मोठयांपासून ते लहान मुलांपर्यंत याचा अधिक परिणाम होऊ शकतो.

हवेच्या गुणवत्तेवर परिणाम

वारंवार अगरबत्ती लावल्याने घरातील हवेची गुणवत्ता बिघडते, विशेषतः बंदिस्त जागेत. एका संशोधनानुसार, अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुराइतकाच हानिकारक असू शकतो.

अॅलर्जीसंबंधी समस्या

अगरबत्तीतील कृत्रिम सुगंध आणि धूरामुळे नाक बंद होणे, डोळे जळजळणे, त्वचेला त्रास होणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कॅन्सरचा धाेका

दीर्घकाळ अगरबत्तीच्या धुराचा संपर्क आल्यास, त्यातील रासायनिक घटक कर्कराेगास कारणीभूत ठरू शकतात. असे काही संशाेधन सांगते.

आग लागण्याचा धाेका

जर अगरबत्ती याेग्य प्रकारे न विझवल्यास किंवा पडल्यास आग लागण्याची शक्यता असते. विशेषत : पडदे, लाकडी फर्निचर आणि कपडे यांसारख्या ज्वलनशील वस्तूंच्या जवळ अगरबत्ती ठेवणे धाेकादायक ठरू शकते.

पर्याय म्हणून काय करता येईल ?

  • नैसर्गिक धूप वापरणे जसे की गवती चहा, कपूर, लोभान
  • इलेक्ट्रिक धूप किंवा अराेमा डिफ्यूझर वापरणे
  • अगरबत्ती लावताना खिडक्या उघडणे
  • तुम्ही रासायनिक अगरबत्यांऐवजी नैसर्गिक सुगंधी काड्या वापरू शकता.

हेही वाचा : Apple Benefits : एक सफरचंद रोज खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?


Edited By : Prachi Manjrekar

Manini