सर्दीचा त्रास वर्षभर असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालेली आहे. यामागचं कारण म्हणजे वातावरणात होणारे बदल, लाइफस्टाइलमुळे वाढत्या प्रदूषण धुळीमुळे आपल्याला वारंवार सर्दी होते. सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित त्रास ही एक आता सामान्य समस्या बनली आहे. सर्वसाधारण सर्दी ही 7 ते 10 दिवस असते. परंतु काही वेळा सर्दी 10 पेक्षा जास्त दिवस असते. यासाठी कुठेतरी आपणच कारणीभूत असतो. आज आपण जाणून घेऊयात सर्दी कमी करण्यासाठी काही प्रभावी उपाय.
गरम पाणी किंवा दूध
जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर तुम्ही नियमितपणे गरम पाणी किंवा हळदीचे दूध प्या. हे नियमित केल्याने घशाला आराम मिळेल आणि सर्दी देखील होणार नाही हळदीच्या दुधात अँटी बॅक्टरीअल गुणधर्म असल्यामुळे सर्दी होत नाही. गरम पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. याने सर्दीचा त्रास देखील दूर होईल.
विश्रांती
जास्तीजास्त विश्रांती घ्या. बऱ्याचदा धावपळीमुळे आणि बाहेर वाढत्या प्रदूषणामुळे आपल्याला लगेच सर्दीचा त्रास होतो. त्यामुळे शांत झोप घ्या. जर झोप होत नसेल खूप धावपळ होत असेल तर सर्दी ताप लगेच येतो त्यामुळे विश्रांती घ्या.
आल्याचा चहा
आल्याचा वापर करून सर्दी नियंत्रित करू शकता. आल्यामुळे घसा खवखवत नाही. मळमळ सारख्या लक्षणांपासून देखील आराम मिळतो. आल्याचा चहा, आले आले आणि सूपमध्ये आल्याचा समावेश केल्याने तुम्हाला खोकला आणि शिंकणे यासारख्या लक्षणांवर मात करता येते
वाफ
वाफ घेतल्याने सर्दी कमी होऊन तुम्हाला आराम मिळेल. बरेच लोक सर्दी किंवा ज्या व्यक्तींना सायन्सचा त्रास आहे. ते नाकाचे मार्ग शांत करण्यासाठी आणि उघडण्यासाठी हे करतात.
पौष्टिक आहार
पौष्टिक आहार घेतल्याने ही समस्या कमी होईल तुमच्या आहारात ताज्या भाज्या, फळे इत्यादींचा समावेश करा. शरीराला योग्य प्रमाणात पोषक घटक मिळाल्याने ही समस्या कमी होईल.
थंड पदार्थ खाणे टाळा
जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल तर थंड पदार्थ खाणे टाळा. थंड पेयांमुळे तुमचा त्रास अजून वाढू शकतो.
हेही वाचा : Health : पचनक्रिया सुधारण्यासाठी खाण्यात करा हे बदल
Edited By : Prachi Manjrekar