शरीराच्या उत्तम अरोग्यासाठी अंडी खाणं किती फायदेशीर आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे. अंड्यातील पिवळ्या बलक आणि पांढर्या भागामध्ये प्रत्येकी 3 ग्रॅम प्रथिने असतात. मात्र, अनेकजण अंड्याचा फक्त पांढरा भाग खातात आणि पिवळा बलक काढून टाकतात. पण तुम्हाला माहित आहे का की, अंड्याच्या पांढऱ्या भागासोबतच अंड्यातील पिवळा बलक खाणं देखील तितकचं फायदेशीर आहे. अंड्याच्या पिवळ्या बलकमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट आढळतात.
अंड्यातील पिवळा बलक खाण्याचे फायदे
- अंड्याच्या पिवळ्या बलकमध्ये खूप व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. तसेच या असलेले कोलीन मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
- अंड्याच्या बलकमध्ये हेल्दी फॅट असते ज्यामुळे गुड कोलेस्ट्ऱॉल वाढण्यासाठी मदत होते.
- याच्या सेवनाने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
- तसेच याच्या सेवनाने हाडं मजबूत होण्यास मदत होते.
- या बलकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन देखील असतात, हे डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात.
अंड्यातील बदल खाण्याचे तोटे
- अंड्यातील पिवळे बलक जास्त प्रमाणात खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
- कच्च्या किंवा कमी शिजलेल्या अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असतात.
- अंड्यातील पिवळ बलकांमध्ये कॅलरी आणि चरबी जास्त असते, याचे जास्त सेवन केल्यास वजन वाढू शकते.
- अंड्यातील पिवळे बलक खाल्ल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
हेही वाचा :