Thursday, February 22, 2024
घरमानिनीHealthमिसळ पाव खाण्याचे फायदे-तोटे माहीत आहेत का?

मिसळ पाव खाण्याचे फायदे-तोटे माहीत आहेत का?

Subscribe

वडापाव, पाव भाजी प्रमाणेच मिसळ पाव हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकजण आवडीने खातो. खिशाला परवडणारे हे तिन्ही पदार्थ सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वचजण खातात. स्वस्त असणाऱ्या या चविष्ट पदार्थांना अनेकदा अनहेल्दी म्हटलं जातं. परंतु आज आम्ही तुम्हाला मिसळ पाव खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

मिसळ खाण्याचे फायदे

Easy & Quick Misal Pav Recipe! All You Need is Five Steps

- Advertisement -
  • मिसळच्या एका प्लेट 379 कॅलरीज असतात. मिसळमध्ये वापरले जाणारे कडधान्य, मसाले आरोग्यासाठी पौष्टिक असतात.
  • मिसळ पचायला हलकी असते. शिवाय यामुळे लवकर भूकही लागत नाही.
  • अनेकजणांना कडधान्याच्या भाज्या खायला कंटाळा येतो अशा व्यक्तींनी आठवड्यातून किमान एकदा तरी मिसळ खावी.
  • मिसळमध्ये अनेक प्रोटीन, आर्यन, फायबर, व्हिटॅमिन बी, सी यांसारखे पोषक तत्व असतात.

मिसळ खाण्याचे तोटे

Make Misal Pav - World's Best Traditional Vegan Dish, And Save Up To 20% On Ingredients

 

- Advertisement -
  • हेल्द एक्सपर्ट्सच्या मते, मिसळ सोबत खाल्ला जाणाऱ्या पावाचे अतिरिक्त सेवन करु नये. मिसळ जरी पौष्टिक असली तरी पाव शरीरासाठी योग्य मानला जात नाही.
  • मैद्यामुळे वजन वाढणे, शरीरत अतिरिक्त चरबी वाढणे, पोट फुगण्यासारख्या समस्या उद्भवतात.
  • मिसळ खाताना तुम्ही पावाऐवजी चपातीचा देखील खाऊ शकता.
  • मिसळ सकाळी खाल्ल्याने तुम्हाला अॅसिडीटीची समस्या होऊ शकते.
  • ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी देखील मिसळचे जास्त सेवन करु नये.

हेही वाचा  :

हृदयविकारापासून वाचण्यासाठी करा ‘या’ खाद्यतेलांचा वापर

- Advertisment -

Manini