स्वयंपाक करताना आपण बऱ्याचदा कांदा आणि लसणाचा वापर करतो. कांदा आणि लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. या फायद्याबद्दल आपल्या माहिती आहेच. पण, कांदा आणि लसणाचा वापर केल्यानंतर त्याच्या साली आपण कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. पण, तुम्हाला हे माहित आहे का? कांदा आणि लसणाच्या सालीचा वापर आपण आपल्या रोजच्या उपयोगात आणू शकतो.
कांदा आणि लसणाच्या सालीचे फायदे
- सूप बनवण्यासाठी सालीचा वापर
कांदा आणि लसणाच्या सालीचा वापर आपण सूप बनवण्यासाठी करू शकतो. यामुळे सूपची चव देखील वाढेल याशिवाय आपल्याला पोषक घटकही मिळतील. सूर तयार झाल्यानंतर गाळणीने गाळूण किंवा साली चमच्याने बाजूला काढून तुम्ही सूपचा स्वाद घेऊ शकता.
- पदार्थांची चव वाढवण्यासाठी
पदार्थांची चव वाढवण्यासाठी कांदा आणि लसूण यांच्या साली भाजून घ्या आणि त्याची पावडर करा. या पावडरचा उपयोग पदार्थाची चव वाढवण्यासाठी करता येतो. याशिवाय तुम्ही हि पावडर सॅलडमध्ये वापरू शकता.
- स्नायूंचे दुखणे दूर करण्यासाठी
कांद्याच्या सालीमध्ये पोषक घटक असल्यामुळे याचा वापर करून स्नायूंच्या दुखण्यावर किंवा अवघडलेपणा कमी करू शकतो. त्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करून घ्या आणि त्यामध्ये कांद्याच्या साली घाला. हे पाणी गाळून प्याययल्यास तुमच दुखण कमी होऊल.
- केसांसाठी
कांद्यामध्ये सल्फर असल्यामुळे केसांसाठी फायदेशीर ठरते. कांद्याच्या साली चार ते पाच कप पाण्यामध्ये उकळवा. केस शाम्पूने धुतल्यानंतर या पाण्याचा वापर करा.
- कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी
कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि ते पाणी सकाळी प्यायल्यास आपल्याला याचे अनेक फायदे होतात. या पाण्याची चव फारशी चांगली लागणार नाही. त्यात थोड्या प्रमाणात साखर टाकून प्यायल्यास चवीत फरक पडतो. आणि हे पाणी रोज घेतल्यास केलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
- खत म्हणून वापर
कांद्याच्या सालीमध्ये कॅल्शियम,पोटॅशियम,मॅग्नेशियम,आयर्न सारखे घटक असल्याने, याचा वापर खत म्हणून करू शकतो.
हेही वाचा :
भाज्या आणि फळं धुताना अशी काळजी घ्या….