Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीHealthWinter Health Care : हिवाळ्यात आंघोळीसाठी उकळते पाणी घेताय?

Winter Health Care : हिवाळ्यात आंघोळीसाठी उकळते पाणी घेताय?

Subscribe

हिवाळा सुरु होताच आपण गरम पाण्याने आंघोळ करताे. थंडी जास्त असल्यामुळे थंड पाण्याने आंघॊळ करणे शक्यतो टाळतो. कडकडीत पाण्याने आंघोळ करतो. हिवाळ्यात थंडगार पाणी आपल्याला सहन होत नाही तसेच थंडी घालवण्यासाठी आणि शरीराला उब मिळण्यासाठी आपण गरम पाण्याने आंघोळ करतो. बऱ्याचदा आपल्या असे वाटते गरम पाण्याने आंघोळ केल्याने आपल्याला सर्दी ताप खोकला इत्यादी आजार होत नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? जास्त उकळत्या पाण्याने आंघोळ करणे हे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे हे आपल्या आरोग्यसाठी चांगले नसते. या गरम पाण्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जास्त प्रमाणात गरम पाण्यानी अंघोळ केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील मॉईश्वर निघून जाते. आणि त्वचा देखील ड्राय होते.

- Advertisement -

हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणं पडेल महागात

डोळ्यांचे आजार

नियमित जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने डोळ्यातील ओलावा निघून जातो. त्यामुळे आपल्याला डोळ्यांचे आजार होऊ शकतात.

त्वचेचे आजार

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील केराटिन पेशींनचे नुकसान होते. ज्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, कोरडेपणा आणि पुरळ उठणे यासारख्या समस्या उद्भवतात.

- Advertisement -

ब्लड प्रेशर

जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होत असेल तर तुम्ही चुकनही गरम पाण्याने आंघोळ करू नका.

आळस निर्माण होतो

जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने आळस निर्माण होतो, आणि त्या आळसामुळे कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही.

चेहरा गरम पाण्याने धुवू नका

तज्ज्ञांच्या मते चेहरा धुताना कधीही गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.त्याचसह चेहऱ्यावरील पोर्स ओपन होऊन त्यामध्ये बॅक्टिरिया प्रवेश करतात.

केसांसाठी

गरम पाणी केसांसाठी सुद्धा अत्यंत धोकादायक ठरु शकते. या गरम पाण्यामुळे केसामध्ये कोंडा, केस गळती इत्यादी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे केस धुताना कोमट पाण्याचा वापर करा.

यामुळे हिवाळ्यात नेहमी कोमट पाण्याने अंघोळ करावी, कडकडीत गरम पाण्याचे अंघोळ करणं टाळावं, असा सल्ला दिला जातो.

हेही वाचा : Cracked Heels : हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्यात? करा हे उपाय


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini