नखं घासण्याने खरंच केस वाढतात? जाणून घ्या सत्य

तुम्ही आत्तापर्यंत अनेकांना नखं घासताना पाहिलं असेल. याला बालयम देखील म्हटलं जातं. खरं तर याचा अर्थ ‘केसांचा व्यायाम’ असा आहे. याला योग आणि रिफ्लेक्सोलॉजी दोन्ही म्हणून ओळखले जाते. या योगाचे काही आश्चर्यचकित करणारे फायदे आहेत. हा योग केल्याने नैसर्गिकरित्या तुमच्या केस मजबूत होतात. अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही, पण आज आम्ही तुम्हाला सांगणार या व्यायामाचे अनेक फायदे सांगणार आहोत. जे खरंच तुमच्या केसांसाठी वरदान ठरु शकतात.

नखांचा संबंध केसांशी

बालायाम योग के 5 फायदे – Balayam Yoga Benefits in Hindi - HindiHealthGuide

आयुर्वेदामध्ये देखील बालयमाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. खरं तर, हातांची नखं एकत्र घासल्याने केसांवर चांगला परिणाम दिसतो, कारण आपल्या नखांच्या नसा टाळूशी जोडलेल्या असतात. नखे घासल्याने त्याचा थेट संबंध टाळूवर पडतो. त्यामुळे रक्ताभिसरण योग्य आणि जलद होऊ लागते, ज्यामुळे केस गळती कमी होऊ लागते आणि रक्ताभिसरणाने केस पुन्हा वाढू लागतात. नखे घासण्याने डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत होते ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते. तसेच केस पांढरे होणे, जास्त केस गळणे, टक्कल पडणे आणि निद्रानाश यांसारख्या समस्याही नखे घासल्याने कमी होतात.

बालयम कसे करावे?

Balayam Yoga for Hair Growth: Meaning, Benefits, Side Effects | cult.fit

बालयम म्हणजेच नखं घालण्यासाठी सुरुवातील आपले दोन्ही हात छातीजवळ ठेऊन बोटं आतील बाजूस ठेवावी आणि दोन्ही हाताची नखे एकमेकांवर घासावी. या व्यायाम दररोज 5 ते 10 मिनिट करावा. ज्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल.

या व्यक्तींनी करु नये बालयम

ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी हा व्यायाम करु नये. तसेच ज्यांनी रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी देखील हा व्यायाम करु नये.


हेही वाचा :