गोड खाणं” ही प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गोड पदार्थ केवळ चविष्टच नसतात, तर ते मनाला आनंद देतात. आणि प्रत्येक सण-उत्सवात या गोड पदार्थांना विशिष्ट स्थान दिले जाते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच काहीतरी गोड खायला आवडतं. परंतु शुगरचे सेवन आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते. आज आपण जाणून घेऊयात, शुगरच सेवन केल्याने एन्जाइटी ट्रिगर होते का ?
शुगरच सेवन केल्याने एन्जाइटी ट्रिगर होते. यामागचं कारण म्हणजे, शुगर घेतल्यानंतर शरीरात रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि नंतर ती अचानक घटते. यामुळे मूड स्विंग्स, थकवा, चिडचिड, आणि चिंतेची लक्षणे अधिक तीव्र होतात.तसेच शुगरची सवय ही मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम करू शकते.
ब्लड शुगर लेव्हलमध्ये चढ-उतार
शुगर खाल्यानेनंतर ब्लड शुगर झपाट्याने वाढते आणि नंतर अचानक कमी होते. यामुळे मूड स्विंग्स, चिडचिड, आणि अस्वस्थता जाणवू लागते.
कोर्टिसोलची पातळी वाढते
शुगर किंवा जास्त शुगरयुक्त पदार्थ खाल्याने कोर्टिसोलची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे तणावसंबंधी हार्मोन सक्रिय होतात. ज्यामुळे एन्जायटीची लक्षणे वाढू शकतात.
सेरोटोनिन आणि मेंदूच्या केमिकल्सवर परिणाम
शुगरचा अधिक वापर मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइन या केमिकल्सवर परिणाम करतो, ज्यामुळे एन्जायटीचा धोका वाढतो.
झोपेचा अभाव
जास्त शुगरचे सेवन केल्याने झोप नीट लागत नाही. ज्यामुळे एन्जायटी अजून वाढू लागते.
उपाय
- साखरेचा वापर कमी करा.
- आहारात कमी शुगर वापरा
- प्रथिने, फायबर, आणि हेल्दी फॅट्स जास्त खा.
- हळूहळू शुगरचे सेवन कमी करा.
- गोड खाण्याची इच्छा असल्यास फळे, किंवा डार्क चॉकलेट खा.
- नियमित व्यायाम करा आणि ध्यानधारणा करा.
- समस्या वाढली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
हेही वाचा : Health Tips : लोअर बॉडीसाठी हे व्यायाम आहे फायदेशीर
Edited By : Prachi Manjrekar