हल्ली धावपळीच्या काळात आपल्याला सगळ्याच गोष्टी वेगाने करण्याची सवय असते. भराभर यावरून कामासाठी निघणे, घाईत जेवण करणे, गटागट पाणी पिणे. आपण सर्वच गोष्टी धावत पळत आणि वेगाने करतो. मात्र हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असते. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. असे असले तरी मात्र, आपण पाणी कसे पितो हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. बहुतेक लोक उभे राहून पाणी पितात. काही लोक म्हणतात की, उभे राहून पाणी पिल्याने गुडघ्यांवर वाईट परिणाम होतो. आणि ते लवकर कमजोर होतात. खरंच अस होत का जाणून घेऊया.
उभं राहून पाणी प्यायल्याने काय होतं?
- उभे राहून पाणी पिल्याने असा काही त्रास होतो हे सांगणारी कोणतीही रिसर्च आतापर्यंत समोर आलेली नाही. आपण जे काही खातो किंवा पितो ते सर्व आपल्या अन्ननलिकेद्वारे आपल्या पोटात जाते. त्यानंतर मग आपल्या आतड्यांपर्यंत पोहोचते आणि तिथे ते शोषले जाते.
- उभे राहून पाणी प्यायल्यामुळे निश्चितपणे काही समस्या उद्भवू शकतात. उभे राहून पाणी प्यायल्याने ते शरीरात लवकर शोषले जाते. जे सांध्यांसाठी अयोग्य आहे. दीर्घकाळ ही पद्धत केल्यास सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
- उभे राहून पाणी प्यायल्यामुळे पाणी फिल्टर नव्हता पोटाच्या खालच्या भागात पोहोचते. ज्यामुळे किडनीवर दाब पडतो. यामुळे किडनीशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उभे राहून पाणी पिऊ नये.
या गोष्टी लक्षात ठेवा
- शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. रोज 4 ते 5 लिटर पाणी पिणे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे
- पाणी फार कमी किंवा फारच जास्त प्रमाणात पिऊ नये. हे दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक आहेत.
- पाणी नेहमी आरामात बसून प्यावे, घोट घोट करून प्यावे. जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर पाणी पिणे चांगले.
- सकाळी रिकाम्या पोटी आणि रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी पिणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे.\
Edited By : Nikita Shinde