Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीHealth Tips : PCOS मुळे दात खराब होतात का?

Health Tips : PCOS मुळे दात खराब होतात का?

Subscribe

PCOS म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा एक हार्मोनल विकार आहे. जो स्त्रीच्या अंडाशयांवर आणि संप्रेरकांवर परिणाम करतो. PCOS मुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गर्भधारणेत अडचण, अनियमित मासिक पाळी,वजन वाढणे, केस गळणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच याचा परिणाम आपल्या दातांवर सुद्धा होतो. आज आपण जाणून घेऊयात, PCOS मुळे दात कसे खराब होतात आणि PCOS कसा परिणाम आपल्या दातांवर होतो.

PCOS मुळे होणाऱ्या डेंटल हेल्थच्या समस्या

  • कॅव्हिटी
  • हिरड्यांची सूज
  • तोंड सुकणे
  • तोंडाचा दुर्गंध

PCOS मुळे दात कसे खराब होतात ?

  • PCOS मुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी कमी-जास्त होते. त्यामुळे तोंडात बॅक्टेरियांची संख्या वाढते, ज्यामुळे हिरड्यांना इन्फेक्शन आणि कॅव्हिटी होण्याची शक्यता वाढते.
  • PCOS महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिकार होतो, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. जास्त साखरेमुळे तोंडात बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे दात खराब होण्याचा धोका वाढू लागतो.
  • PCOS मुळे तोंड वारंवार ड्राय होते. यामुळे तोंडातील लाळ कमी होते. लाळ दातांना स्वच्छ ठेवण्यास मदत करते लाळ कमी झाल्यास दातांमध्ये अन्नकण आणि बॅक्टेरिया चिकटून राहतात, आणि यामुळे दातात कॅव्हिटी निर्माण होते.
  • या महिलांना साखरेची क्रेविंग्स होत असते. यामुळे या महिला मोठ्या प्रमाणात गोड पदार्थांचे सेवन करतात. आणि यामुळे दातात कॅव्हिटी निर्माण होते.

ओरल हेल्थची अशी घ्या काळजी

नियमित 2 वेळा ब्रश करा

टुथपेस्ट आणि माऊथवॉशमध्ये फ्लोराइडचा वापर करा. आहारावर नियंत्रण ठेवा.

प्रोटीनयुक्त पदार्थ

हिरव्या भाज्या, फळे आणि प्रोटीनयुक्त पदार्थ यांचे सेवन कमी करा.

धूम्रपान आणि मद्यपान

धूम्रपान आणि मद्यपान केल्याने आपल्या आरोग्यासह ओरल हेल्थवरही याचा विपरित परिणाम होतो.

नियमित चेकअप

जर तुम्हाला कॅव्हिटी किंवा हिरड्यांना सूज आली असेल तर नियमित चेकअप करा. नियमित चेकअप केल्याने आपले ओरल हेल्थ चांगले राहते.

हेही वाचा : HMPV virus : HMPV व्हायरसपासून मुलांचे संरक्षण कसे करावे?


Edited By : Prachi Manjrekar

 

 

Manini