Saturday, March 15, 2025
HomeमानिनीBeauty Tips : स्मूदनिंग केल्याने केस डॅमेज होतात का ?

Beauty Tips : स्मूदनिंग केल्याने केस डॅमेज होतात का ?

Subscribe

केसांचे आरोग्य जपण्यासाठी आणि सौंदर्य द्विगुणित करण्यासाठी आपण अनेक हेअर केअर रुटीन फॉलो करतो बऱ्याच ट्रीटमेंट घेतो. केसांची चमक वाढवण्यासाठी महिला स्मूदनिंग करतात. हेअर स्मूदनिंग करताना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर तुमचे केस खराब होऊ शकतात. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात स्मूदनिंग केल्याने केस डॅमेज होतात का ?

3 ते 4 महिन्यानंतर स्मूदनिंग करा

केस डॅमेज होण्याचं मुख्य कारण म्हणजे कमी वेळेचा गॅप असतो. स्मूदनिंग केल्यानंतर तुम्ही लगेच परत स्मूदनिंग करत असाल तर याने तुमचे केस लगेच डॅमेज होऊ शकतात. लगेच स्मूदनिंग ट्रीटमेंट घेतल्याने केस खराब आणि कमकुवत होतात. स्मूदनिंग करताना कमीत कमी 3 ते 4 महिन्यांचा गॅप ठेवा.

हीटिंग टूल्सचा वापर करू नये

जर तुम्ही स्मूदनिंग केल्यानंतर हीटिंग टूल्सचा वापर करत असाल तर तुमचे केस लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे स्मूदनिंग केल्यानंतर केसांवर हीटिंग टूल्सचा वापर करू नका.

केसांना तेल लावू नका

स्मूदनिंग केल्यानंतर केसांना तेल लावू नका. स्मूदनिंग केल्यानंतर केसांना तेल लावल्याने केस डॅमेज होऊ शकतात. यासाठी तुम्ही हेअर सिरमचा वापर करू शकता. हेअर सीरम लावल्याने केसांना चांगले पोषण मिळते. केसांची चमक देखील वाढते.

ओल्या केसांवरून कंगवा फिरवू नका

स्मूदनिंग केल्यानंतर तुम्ही केस धुवत असाल तर ओल्या केसांवरून कंगवा फिरवू नका .

या गोष्टी लक्षात ठेवा

  • स्मूदनिंग केल्यानंतर केमिकम ट्रीटमेंट घेणे टाळा.
  • केस वारंवार धुवू नका.
  • आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करा.
  • प्रदूषण पासून वाचण्यासाठी स्कार्फ बांधा

हेही वाचा वाचा : Beauty Tips : योग्य कंडीशनर कसा निवडायचा?


Edited By : Prachi Manjrekar

Manini