Monday, March 17, 2025
HomeमानिनीHealthHealth Tips : नळातून येणाऱ्या पाण्यामुळेही होऊ शकतो कॅन्सर

Health Tips : नळातून येणाऱ्या पाण्यामुळेही होऊ शकतो कॅन्सर

Subscribe

पाणी हा आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मानवाचे शरीर 70% पाण्याने व्यापलेले आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी पाणी पिणे अत्यंत आवश्यक असते. दिवसाची सुरूवात पाणी पिऊन केल्याने दिवस आरोग्यदायी जातो, असे म्हणतात. शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणी उकळवून त्याचा वापर केला जातो किंवा घरात वॉटर फिल्टर लावले जाते. पण, नुकतंच एका संशोधनातून एक धक्कादायक बाब समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. या संशोधनात नळातून येणाऱ्या पाण्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सांगितली आहे. चला तर मग जाणून घेऊयात, नळातून येणाऱ्या पाण्यामुळेही कॅन्सर कसा होतो आणि तो कसा रोखायचा,

जर्नल ऑफ एक्सपोजर सायन्स एन्ड एन्व्हायर्नमेंटल एपिडेमियोलॉजिमधील अहवालात असे सांगण्यात आले आहे की, आपल्या घरातील नळाच्या पाण्यात कायमस्वरुपी घटक असतात, जे कॅन्सरचे एक प्रमुख कारण आहे. यात असेही सांगण्यात आले आहे की, पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या नळाच्या पाण्यामुळे कॅन्सरचा धोका 33% वाढतो. सध्या जगातील 45%लोक या समस्येने ग्रस्त आहेत.

कॅन्सर निर्माण करणारे घटक –

आर्सेनिक –

आर्सेनिक हा एक हानिकारक केमिकल आहे. जो जमिनीत आढळतो. जर नळाच्या पाण्यात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असेल तर कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

क्लोरीन –

पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. पण, पाण्यात जास्त प्रमाणात क्वोरीन वापरल्यावर त्यात अनेक शरीरासाठी घातक असणारी केमिकल्स तयार होतात.

शिसे –

शिसे घरातील जुने नळ आणि पाइपलाईनमध्ये आढळतो. पाण्यात जास्त प्रमाणात शिसे असल्यास ते शरीरात जमा होऊ लागतात. ज्यामुळे ट्युमर आणि कॅन्सरचा धोका निर्माण होतो.

टिप्सने रोखता येईल कॅन्सरचा धोका –

  • घातक केमिकल्सपासून वाचण्यासाठी पाण्याची चाचणी करावी. यासाठी तुम्हाला स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल.
  • जर पाण्यात आर्सेनिक, शिसे, फ्लोराईड आदी घटक असतील तर तुम्ही नळाला वॉटर फिल्टर बसवू शकता.
  • नळाला वॉटर फिल्टर बसवणे शक्य नसेल तर पाणी उकळून घ्यावे. पाणी उकळवून प्यायल्याने पाण्यातील बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे शुद्ध पाण्यासाठी पाणी उकळवून प्यायला हवे.
  • जर घरात खूप वर्षांपासून एकच पाइपलाईन असेल तर पाइपलाईन बदलावी. कारण अशा पाईपलाईनमध्ये शिसेसारखे घटक आढळतात, जे शरीरासाठी हानिकारक असतात.
  • आपण जे पाणी पित आहोत त्याचे स्त्रोत तपासावे. कारण स्वयंपाकासाठी आणि पिण्यासाठी वापरले जाणारे पाणी कुठून येते, त्याची गुणवत्ता माहित असणे आवश्यक आहे.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini