Friday, February 7, 2025
Homeमानिनीमनी प्लांटची पाने गळतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

मनी प्लांटची पाने गळतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Subscribe

घरातील वातावरण आनंददायी, पॉझिटिव्ह राहावं यासाठी अनेकजण घरात मनी प्लांट लावतात. मनी प्लांटची योग्य वाढ झाली तर घरची शोभा वाढते आणि घराला क्लासी लूक येतो. मात्र, अनेकजणांची अशी तक्रार असते की, मनी प्लांटची पाने गळत आहेत. मनी प्लांटची पाने गळत असतील तर सर्वसाधारणपणे हे सामान्य समजण्यात येते. अनेकजण याला हवामानातील कारण कारणीभूत असेल असे सुद्धा समजतात.

मनी प्लांटची पाने गळण्याची आणि पिवळी पडण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. योग्य वेळी याची दखल घेतल्यास झाडे सुकण्यापासून आणि पाने पिवळी पडण्यापासून वाचवता येतात. जाणून घेऊयात मनी प्लांटची पाने गळण्याची कारणे आणि त्यावरील उपाय ,

रंगावरून कारण शोधा –

योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश केवळ मनी प्लांट नव्हे तर सर्वच झाडांच्या वाढीस मदत करत असतो. पण, प्रकाशाचे प्रमाण जास्त किंवा खूप कमी झाल्यास झाडांचे नुकसानही होऊ शकते. अशाने झाडांच्या पानांचे नुकसान होते. यासाठी तुमच्या घरातील मनी प्लांटची पानांचे बारकाईने निरीक्षण करायला हवे. मनी प्लांटची पाने तपकिरी झाली असतील तर ती हळूहळू पडायला सुरुवात होते. मनी प्लान्टवर थेट सूर्यप्रकाश पडत असेल तर अशाने पाने जळण्याची शक्यता अधिक असते. ज्याने पानांचा रंग तपकिरी दिसतो.

कमी प्रकाशामुळे –

खूप कमी प्रकाशामुळे पाने गळू शकतात. अशावेळी तुम्हाला पानांचा रंग पिवळा दिसेल. जर तुमच्या मनी प्लांटची पाने पिवळी झालेली दिसत असतील तर याला कमी सूर्यप्रकाश जबाबदार असेल.

कीटक –

मनी प्लांटची पाने पिवळसर होण्याचे कारण कीड असू शकते. मनी प्लांटमध्ये कीटक असणे सामान्य आहे कारण हे प्लांट उंच नसतात आणि सर्व बाजुंनी पसरतात. आपण मनी प्लान्टला ज्या दिशेने वळवू त्या दिशेने आपण ते बदलू शकता. जर जास्तच प्रमाणात मनी प्लांटची पाने गळत असतील तर प्लांटच्या पानांवर छोटे आणि तपकिरी डाग दिसतील. याशिवाय प्लांटच्या पानांमध्ये चिकटपण किंवा विचित्र पांढऱ्या जाळीचा थर दिसेल. यामुळे पानांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी तुम्ही कीटकनाशकाचा वापर करू शकता.

पाणी –

शरीराला जशी पाण्याची गरज असते, तशीच झाडांना सुद्धा असते कारण पाण्यामुळे पाने हिरवीगार होतात. पण, पाण्याचा अतिरेक देखील पाने गळतीस कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे मनी प्लांट वाढविण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असायला हवी. त्यासाठी पाण्याची प्रमाण लक्षात घ्यायला हवे. मनी प्लान्टला अधिक सूर्यप्रकाश मिळाल्यास अधिक पाण्याची गरज भासणार आहे हे लक्षात घ्या कारण सूर्यप्रकाशामुळे झाडे कोरडी पडू शकतात. मनी प्लान्टला चांगल्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नसेल तर त्याला जास्त पाणी देऊ नका.

 

 


हेही पहा : झाडांना फुलेच येत नाही, कुंडीत टाका या गोष्टी

 

Manini