Wednesday, March 19, 2025
HomeमानिनीBeauty Tips : रोज मेकअप केल्याने स्किन खराब होते का ?

Beauty Tips : रोज मेकअप केल्याने स्किन खराब होते का ?

Subscribe

मेकअप आणि स्किनकेअर बद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. यापैकी काही खरे आहेत, तर काही फक्त अफवा आहेत. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की रोज मेकअप केल्याने त्वचा खराब होते किंवा नैसर्गिक उत्पादने ही मार्केटमधील उत्पादनांपेक्षा जास्त चांगली असतात. परंतु या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे, ते आज आपण या लेखातून जाणून घेऊयात.

गैरसमज : दररोज मेकअप केल्याने त्वचेचे नुकसान होते आणि सुरकुत्या पडतात

सत्य असं आहे, मेकअप तुमच्या त्वचेला तेव्हाच नुकसान पोहोचवतो जेव्हा तुम्ही कमी दर्जाचे प्रॉडक्ट्सचा वापर करतात. जर तुम्ही चांगल्या दर्जाचे प्रॉडक्ट्स वापरले आणि दररोज मेकअप काढून स्किनकेअर रूटीनचे पालन केले तर तुमच्या त्वचेला नुकसान होत नाही.

गैरसमज : त्वचेसाठी नेहमी नैसर्गिक उत्पादने चांगली असतात

हळद कोरफड, दही इत्यादी नैसर्गिक गोष्टी त्वचेसाठी नेहमीच चांगल्या असतात असं नाही आहे. रसायनयुक्त उत्पादने हानिकारक असतात. काही नैसर्गिक घटक सर्व प्रकारच्या स्किन टाइपसाठी योग्य नसतात त्यामुळे ऍलर्जी किंवा स्किनची रिकॅशन होऊ शकतात.

गैरसमज : उन्हात बाहेर पडल्यावरच सनस्क्रीन लावावे

हा खूप मोठा गैरसमज आहे, तुम्ही नेहमीच सनस्क्रीन लावले पाहिजे कारण ते तुमच्या त्वचेचे तुमच्या परिसरातील सर्व प्रदूषकांपासून आणि अतिनील किरणांपासून संरक्षण करते.

गैरसमज : जास्त पाणी प्यायल्याने त्वचा ग्लो करते

लोक अनेकदा म्हणतात की जर तुम्ही दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्यायले तर तुमची त्वचा ग्लो करेल. खरंतर, पाणी पिणे त्वचेसाठी निश्चितच फायदेशीर आहे, पण फक्त पाणी पिल्याने चमक येत नाही. निरोगी आहार, मॉइश्चरायझर्स, योग्य त्वचेची काळजी आणि जीवनशैली यांचे योग्य संतुलन तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारते.

गैरसमज : महागडे ब्युटी प्रॉडक्ट्स बेस्ट असतात

बऱ्याचवेळा हे खरे नसते. बऱ्याचदा ब्युटी प्रॉडक्ट्सची किंमत जास्त असते. परंतु कॅलिटी आणि इंग्रीडिएंट्स चांगले नसतात. त्यामुळे तुम्ही बजेट फ्रेंडली असलेल्या ब्युटी प्रॉडक्ट्सची देखील निवड करू शकता.

गैरसमज : प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी एकच मॉइश्चरायझर योग्य आहे

बऱ्याच लोकांना असे वाटते तेलकट त्वचेवर मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही परंतु हे खरे नाही.जर त्वचेला योग्य प्रमाणात हायड्रेशन मिळाले नाही तर त्वचा स्वतःच जास्त तेल तयार करू लागते यामुळे मुरुम आणि ब्रेकआउटची समस्या वाढू शकते. खरंतर, तेलकट त्वचा असलेले लोक देखील मॉइश्चरायझर वापरू शकतात. यासाठी, हलके, जेल-आधारित आणि तेल-मुक्त मॉइश्चरायझर्स सर्वोत्तम आहेत.

हेही वाचा : Beauty Tips : होममेड केमिकल फ्री ब्लिच


Edited By : Prachi Manjrekar

Manini