Friday, January 24, 2025
HomeमानिनीHealth Tips : आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटते?

Health Tips : आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटते?

Subscribe

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होते. त्यामुळे आपण सहजपणे आजारी पडतो. तसेच आपल्याला त्वचेशी संबंधित समस्यांना देखील सामोरे जावे लागते. त्वचा कोरडी पडणे ,ओठ फुटणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. बऱ्याच लोकांना या दिवसात आंघोळ केल्यावर त्वचेला खाज सुटते. आज आपण जाणून घेऊयात, आंघोळीनंतर कोणत्या उपायांनी त्वचेला खाज सुटणार नाही.

आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटण्याची कारणे

आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटण्याची समस्या हिवाळ्यात सामान्य आहे. हे सामान्यत: कोरडेपणा, अ‍ॅलर्जी किंवा केमिकल उत्पादनांमुळे या समस्या उद्भवतात.

कोरडी त्वचा

हिवाळयात आपण बऱ्याचदा गरम पाण्याने आंघाेळ करतो. गरम पाणी वापरल्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेला खाज सुटू लागते.

साबण किंवा बॉडी वॉशमधील रसायने

हार्श केमिकल्स असलेले साबण किंवा बॉडी वॉशमुळे या समस्या निर्माण होतात.

अ‍ॅलर्जी

बऱ्याच लोकांना त्वचेची अ‍ॅलर्जी असते. त्यामुळे त्यांना आंघोळ केल्यानंतर त्वचेला खाज सुटते. विशिष्ट साबण, लोशन, किंवा कपड्यांमुळे ही अ‍ॅलर्जी निर्माण होते.

उपाय

कोमट पाण्याने आंघोळ करा

आंघोळीसाठी तुम्ही जास्त गरम किंवा थंड पाणी न वापरता कोमट पाण्याने आंघोळ करा हे पाणी आपल्या त्वचेसाठी देखील चांगले असते.

मॉइश्चरायझर लावा

आंघोळीनंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावा. कोको बटर, शिया बटर, किंवा अलोवेरा जेल लावा.

तेलांचा वापर करा

नारळ तेल, ऑलिव्ह तेल किंवा बादाम तेल आंघोळीनंतर लावा.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर तुम्हाला वारंवार हा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता.

हेही वाचा : Hair Fall Problem : हेअर फॉलवर अंडी बेस्ट


Edited By : Prachi Manjrekar

 

 

 

 

Manini