रात्री शांत झोप लागत नाही का? मग वापरा या ट्रिक्स

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका व्यक्तीने झोप येण्यासाठी एक नवीन ट्रिक सांगितलेली आहे

दिवसभराच्या कामानंतर रात्री अंधरूणावर पडल्या पडल्या लगेच झोप लागणे हे सुख फार कमी लोकांच्या आयुष्यात असते. आजकाल अनेक लोक रात्री झोप न येण्याच्या समस्येचा सामना करत असतात. डोक्यामध्ये सतत चालू असणाऱ्या अनेक विचारांमुळे अनेक रात्री झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यासाठी लोक औषधांचा वापर करतात. अशाच निद्रानाश झालेल्या लोकांसाठी झोप येण्यासाठी एक खास व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीमध्ये दाखवलेली ट्रिक वापरून २ मिनीटांमध्ये तुम्हाला झोप येईल.

या ट्रिकमुळे २ मिनीटांमध्ये लागेल शांत झोप

 मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका व्यक्तीने झोप येण्यासाठी एक नवीन ट्रिक सांगितलेली आहे. या व्यक्तीने या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या व्यक्तीने लवकर झोपण्यासाठी मनगटाच्या एका खास जागेवर चोळायला किंवा हलक्या हाताने या जागेवर दाब द्यायला सांगितले आहे. यामुळे तुमचं डोकं शांत होईल.

रिसर्चमध्ये सुद्धा स्पष्ट


२०१० आणि २०१५ मध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या रिसर्चनुसार मनगटाच्या पल्स पॉईंटमध्ये मसाज करण्यात आली, ज्याचा रिजर्ट खूप चांगला आला होता. तसेच रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या लोकांना बराच चांगला फरक अनुभवता आला, तसेच जे लोक झोप येण्यासाठी औषधांचा वापर करत होते, ते प्रमाण सुद्धा कमी झाले.