Saturday, June 10, 2023
घर मानिनी Fashion डॉली जैन कोण? जी साडी ड्रेप करण्यासाठी घेते 2 लाख रुपये

डॉली जैन कोण? जी साडी ड्रेप करण्यासाठी घेते 2 लाख रुपये

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्र्यांच्या आउटफिटची चर्चा प्रत्येकवेळी होते. परंतु जेव्हा साडीतील लूक मध्ये त्यांना पाहिले जाते तेव्हा सर्वात प्रथम नाव डॉली जैन हिचेच येते. खरंतर डॉली जैन ही साडी नेसवण्यात मास्टर आहे. डॉली ही प्रसिद्ध ड्रेपिंग आर्टिस्ट मध्ये गणले जाते. तिच्याबद्दल असे म्हटले जाते की, केवळ 18 सेकंदात ती एखाद्याला साडी नेसवते. सध्या तिची जोरदार चर्चा सुरु आहे. असे सुद्धा बोलले जाते की, 325 विविध स्टाइलमध्ये ती साडी नेसवू शकते.

डॉली जैन हिची ड्रेपिंग फीस खुप जास्तच आहे. तिची फी 35 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत आहे. ऐवढेच नव्हे तर साडी ड्रेपिंगमध्ये तिला कोणीही टक्कर देऊ शकत नाही.

- Advertisement -

डॉली जैनने दीपिका पादुकोणच्या वेडिंग रिसेप्शन, सोनमच्या मेहंदीवेळी आणि आलियासह नयनताराच्या लग्नावेळी ही तिने साडी नेसवली होती. ऐवढेच नव्हे तर NMACC इवेंटमध्ये गिगी हदीदला सुद्धा तिने साडी नेसवली होती.

- Advertisement -

डॉली जैनने इंडियन आयडॉल 13 मध्ये आपल्या या क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगितले होते. त्यावेळी तिने असे म्हटले होते की, साडी नेसणे तिला अजिबात आवडत नव्हते. पण जेोव्हा लग्न झाले त्यानंतर सासूने केवळ साडीच नेसायची असे सांगितले होते. त्यामुळेच तिला रोज साडी नेसायला लागायची. तिने हे सुद्धा सांगितले की, तिला सुरुवातीला साडी नेसण्यासाठी 45 मिनिटे लागयाची. पण जेव्हा सासूने साडी ऐवजी सूट घालत जा असे सांगितले तेव्हा ती साडी नेसणे सोडूच शकली नाही.


हेही वाचा- Photo : कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सारा अली खानचा देसी लूक

- Advertisment -

Manini