घरलाईफस्टाईलCareer Tips : 'या' वाईट सवयींमुळे career येईल धोक्यात

Career Tips : ‘या’ वाईट सवयींमुळे career येईल धोक्यात

Subscribe

करिअर करत असताना अनेक गोष्टी आपल्या कडून चुकत असतात. आपल्याला या चुकीमुळे अनेक गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. याचा परिणाम थेट आपल्या कॅरिअर पडत असतो. तसेच career घडवत असताना प्रामुख्याने काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तसेच नियमाच्या बाहेर कोणत्या गोष्टी येत असतील तर त्याचे योग्य पालन आपल्या कडून व्हायला हवे.

 

- Advertisement -

Challenging Inappropriate Behaviour in the Workplace | CHAS

 

- Advertisement -
  • सर्वांसमोर मोठ्याने रडणे-

काही लोक प्रत्येक गोष्टीवर रडत राहतात. ऑफिसच्या सगळ्या कामाचं दडपण आपल्यावर आहे असं त्यांना वाटतं आणि एखादी छोटीशी नवी जबाबदारी मिळाल्यावर ते रडायला लागतात. असे केल्याने ऑफिसमध्ये तुमची इमेज खराब होऊ शकते आणि त्याचा तुमच्या प्रमोशनवरही परिणाम होऊ शकतो.

  • स्वच्छतेची काळजी न घेणे-

काही लोक ऑफिसमधील स्वच्छतेकडे अजिबात लक्ष देत नाहीत. स्वच्छतागृह असो की बैठकीची खोली, ते कुठेही स्वच्छता ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलीन होते आणि प्रगतीच्या संधीही हाताबाहेर जातात.

  •  ईमेल Atket-

अधिकृत ईमेल पाठवताना काही लोक एसएमएसची भाषा वापरतात, तसेच काही लोक spellingच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात. अशा लोकांचा क्लायंटवर चांगला प्रभाव पडत नाही, ज्यामुळे त्यांच्या प्रगती होत नाही आणि ते अनेक चांगल्या संधी गमावतात.

  • गप्पाटप्पा मारत बसणे-

ऑफिसमध्ये गॉसिप करणारी माणसं कोणालाच आवडत नाहीत. अशा लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील फरक कळत नाही आणि कधीकधी ते अडचणीत येतात. त्यामुळे ऑफिसमधील गॉसिप किंवा वैयक्तिक गोष्टी शेअर करणे टाळा.

  • टाईमपास करणारी माणसे-

काही लोक ऑफिसमध्ये टाईमपास करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. किंवा काम टाळून टाईमपास करणे हा त्यांचा स्वभावच असतो. असे लोक केवळ आपला वेळ वाया घालवत नाहीत, तर इतरांसोबत बसतात आणि त्यांना काम करू देत नाहीत. यामुळे ऑफिस कल्चर खराब होत.


हेही वाचा : https://www.mymahanagar.com/web-stories/success-mantra-for-life/

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -