Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल बदलत्या मोसमात चुकूनही करु नका 'या' चूका, करावा लागेल आजाराचा सामना

बदलत्या मोसमात चुकूनही करु नका ‘या’ चूका, करावा लागेल आजाराचा सामना

बदलत्या मोसमात स्वत:ची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशा दिवसात नेमक्या कोणत्या गोष्टी करु नयेत हे जाणून घेणेही अत्यंत गरजेचे आहे.

Related Story

- Advertisement -

सध्या निसर्गाचे चक्र उलटे फिरत आहे. थंडीच्या दिवसात कधी पाऊस पडतो तर कधी कडाक्याचे ऊन. बदलत्या मोसमात आपल्या शरीररातही अनेक गोष्टी सतत बदलत असतात. मात्र आपण कधीकधी त्याकडे दुर्लक्ष करतो. सतत बदलणाऱ्या मोसमात आपण आपली काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र कामाच्या ताणात आपण सगळ्या गोष्टी विसरतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरिरावर होत असतो. त्यामुळे बदलत्या मोसमात स्वत:ची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशा दिवसात नेमक्या कोणत्या गोष्टी करु नयेत हे जाणून घेणेही अत्यंत गरजेचे आहे. बदलच्या मोसमात नेमक्या कोणत्या गोष्टी करु नयेत ते जाणून घ्या.

खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या

- Advertisement -

थंडीच्या दिवसात किंवा बदलत्या मोसमातही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. या दिवसात थंड पदार्थ खाणे टाळा. जास्त थंड पदार्थ खाल्ल्याने खोकला होऊ शकतो. त्याचबरोबर सर्दी, ताप यासारखे आजार होऊ शकतात.

ACचा वापर टाळा

- Advertisement -

सध्याच्या बदलत्या मोसमात कधी कधी थंड वातावरण जाणवत आहे. या काळात शक्यतो एसीचा वापर करणे टाळा. एसीच्या हवेमुळे तुम्ही आजारी पडू शकता. एसीच्या हवेपेक्षा बाहेरील नैसर्गिक हवा घेण्याचा प्रयत्न करा.

उन्हात फिरणे टाळा

बदलत्या मोसमात उन्हात फिरणे टाळा. या दिवसात बाहेरील वातावरण आपल्या शरीरासाठी अनुकूल नसते त्यामुळे बाहेरील कडक उन्हामुळे आपण आजारी पडू शकतो.

योग्य कपडे घाला


मोसम सातत्याने बदलत असल्याने कधी थंडी वाजते तर कधी गरम होते. मात्र शक्यतो या दिवसात तोकडे कपडे घालू नका. फॅशनेबल असले तरी चालेल परंतु शरीर झाकेल असे पूर्ण कपडे घाला. पूर्ण कपडे घातल्याने त्वचा टॅन होणार नाही.


हेही वाचा – तुम्हालाही रात्री उशिरा भूक लागते का? तर खा ‘हे’ पदार्थ

 

- Advertisement -