प्रत्येक महिलेला साडी नेसायला खूप आवडते. साडी नसल्याने महिलांचे साैंदर्य द्विगुणित होते. साडी नेसताना आपल्याला बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. बऱ्याचदा साडी नेसताना काही सामान्य चुका होतात, जर त्या चुका टाळल्या नाही तर आपला संपूर्ण लूक खराब होऊ शकतो. आज आपण जाणून घेऊयात साडी नेसताना कोणत्या चुका करू नये.
चुकीची साडीची लांबी आणि ड्रॅपिंग स्टाइल
साडीची लांबी योग्य असली पाहिजे. खूप लांब किंवा खूप लहान साडी चालताना अडचण निर्माण करू शकते. ड्रॅपिंग व्यवस्थित नसेल तर लूक खराब दिसतो. त्यामुळे आरशासमोर साडी नेसल्याने तुम्हाला अंदाज मिळेल.
ब्लाउजची फिटिंग चुकीची असणे
खूप घट्ट किंवा सैल ब्लाउज तुमचा लूक खराब करू शकते. त्यामुळे योग्य फिटिंग असलेला ब्लाउज शिवून घ्या.
योग्य ठिकाणी पिन्स न लावणे
साडी व्यवस्थित सेट राहण्यासाठी योग्य ठिकाणी पिन्स लावणे गरजेचे आहे. पिन योग्यरीत्या लावल्या नाहीत तर साडी सुटू शकते किंवा दिसायला वेगळी वाटू शकते. त्यामुळे पिन लक्षपूर्वक वापरा.
अयोग्य साडी निवडणे
आपल्या शरीरयष्टीला आणि प्रसंगाला साजेशी साडी निवडणे महत्त्वाचे आहे. उंच महिलांनी जाड बॉर्डर असलेल्या साड्यांची निवड करावी तर कमी उंची असलेल्या महिलांसाठी पातळ बॉर्डरच्या साड्या चांगल्या दिसतात.
केसांची योग्य सेटिंग न करणे
साडीसोबत स्टाइलिश किंवा क्लासी हेअरस्टाइल असणे गरजेचे आहे. या हेअरस्टाइलमुळे तुमचा लूक अजून सुंदर आणि परिपूर्ण दिसतो. तुम्ही साडीप्रमाणे केसांची हेअरस्टाइल करू शकता.
योग्य अॅक्सेसरीज न निवडणे
साडी आणि तुमचा लूक सुंदर दिसत असेल परंतु ज्वेलरी मॅच होत नसेल तर तुमचा लूक खराब दिसू शकतो त्यामुळे योग्य अॅक्सेसरीजची निवड करा.
हेही वाचा : Spring Fashion Tips : स्प्रिंग सीझनसाठी स्पेशल फ्लोरल कुर्ती डिझाइन्स
Edited By : Prachi Manjrekar