Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीTiffin Box Tips : मुलांना टिफिनसाठी प्लॅस्टिकच्या डब्याचा वापर करताय? वाचा दुष्परिणाम

Tiffin Box Tips : मुलांना टिफिनसाठी प्लॅस्टिकच्या डब्याचा वापर करताय? वाचा दुष्परिणाम

Subscribe

बऱ्याच महिला मुलांना टिफिनसाठी प्लॅस्टिकच्या डब्याचाच वापर करतात. प्लॅस्टिक इतर धातूपेक्षा स्वस्त असल्याने आणि वजनाने हलका असल्याने प्लॅस्टिकच्या डब्याला प्राधान्य दिले जाते. रंगीबेरंगी, विविध आकारात प्लॅस्टिकचे डब्बे बाजारात मिळतात. त्यामुळे मुलांना सुद्धा या टिफिन बॅाक्सचे आकर्षण राहते. पण, असे सर्व असले तरी प्लॅस्टिकच्या डब्यातून मुलांना जेवण देणे हे मुलांच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या आरोग्यासाठीसुद्धा हानिकारक ठरू शकते. जाणून घेऊयात, प्लॅस्टिकच्या डब्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो.

प्लॅस्टिकच्या डब्यात जेवण्याचे दुष्परिणाम –

प्लॅस्टिकच्या डब्यात गरमागरम अन्नपदार्थ पॅक केल्याने प्लॅस्टिकचे केमिकल वितळून डब्यातील अन्नपदार्थाला चिकटू शकतात. अशाप्रकारे प्लॅस्टिक अन्नासोबत पोटात जाऊ शकते. परिणामी, मुलांना पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे मुलांना टिफिनसाठी प्लॅस्टिक ऐवजी स्टीलचा टिफिन द्यावा.

काही प्लॅस्टिकमध्ये विषारी रसायने असतात जसे की बिस्फेनॉल ए (BPA) आणि फ्थालेट्स, ज्यांचा अन्नाशी संपर्क आल्यावर त्यात मिसळू शकतात. हे रसायने आरोग्यास हानिकारक असतात.

गरम अन्न किंवा मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यांमधून अधिक प्रमाणात रसायने अन्नात मिसळतात. त्यामुळे आॅफिससाठी जर प्लॅस्टिक टिफिन घेऊन जात असाल तर असे करणे बंद करा. हे आरोग्याच्या विविध तक्रारीचे कारण ठरू शकते.

प्लॅस्टिकचे डबे स्वच्छ करणे कठीण काम असते. कारण या ड्ब्ब्यांना एक प्रकारची खाच असते. यात कित्येकदा अन्नपदार्थ अडकतात. त्यामुळे कितीही घासले तरी डब्याला अन्नाचा वास तसाच राहतो, पदार्थही तसेच राहतात. ज्यामुळे बॅक्टेरिया डब्यात जमा होऊ शकतात.

प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी हानिकारक असते. आपण जे प्लॅस्टिक वापरतो त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याने प्लास्टिकचे डबे वापरणे टाळायला हवे.

 

 

 


हेही पाहा :

Manini