Sunday, April 21, 2024
घरमानिनीसकाळी लवकर जाग येत नाही? मग वापरा या टिप्स

सकाळी लवकर जाग येत नाही? मग वापरा या टिप्स

Subscribe

निरोगी आयुष्यासाठी संतुलित आहारसोबत पुरेशी झोपही आवश्यक असते. मात्र, आजकाल बदलत्या लाइफस्टाइलमुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे अनेकदा रात्री उशिरा झोपल्याने सकाळी लवकर जाग येणे कठीण होत आहे. स्वतःला शारीरिक आणि मानसिकरीत्या तंदुरुस्त ठेवायचे असेल तर सकाळी लवकर उठणे हा उत्तम पर्याय आहे. सकाळी उठण्याचे तसे अनेक फायदे आहेत. पण, अनेकांना सकाळी लवकर जाग येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळी लवकर जाग येण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.

1.आदल्या रात्री लवकर झोपण्याचा प्रयन्त करा. यासाठी तुम्ही अलार्म सेट करू शकता. 7 ते 8 तास झोपेचे लक्ष्य निश्चित करा.

- Advertisement -

2.स्नूज बटण दाबण्याची सवय नियंत्रित करा. अलार्म बेडपासून दूर ठेवा. जेणेकरून तो बंद करण्यासाठी तुम्हाला बेडवरुन उठावे लागेल. याने बेड सोडण्याच्या आळशीपणावर तुम्ही मत करू शकाल.

3.सकाळचा दिनक्रम सेट करा. यासाठी आदल्या रात्री तुम्ही याची यादी सेट करू शकता. याने दुसऱ्या दिवशी उठल्यावर तुमच्या कामाचे व्यवस्थित नियोजन होईल.

- Advertisement -

4.सकाळी उठल्यावर करण्याची कार्ये मजेशीर ठेवा. ज्याने तुम्हाला सकाळी उठण्यासाठी प्रोत्सहन मिळेल.

5.सकाळसोबतच रात्रीचा नित्यक्रमही बनवा.

6.रात्री झोपण्याच्या २ तास आधी चहा किंवा कॉफी घेऊ नका. यामुळे निद्रानाश होतो. ज्याचा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होतो.

7.अस्वास्थकार अन्नपदार्थ खाणे टाळा. याचा परिणाम झोपेवरही होतो.

8.सुरुवातीचे दिवस कंटाळा येईलच. पण, तुम्हाला एकदा का सवय झाली की तुम्ही स्वतःहूनच सकाळी उठाल, तुम्हाला जाग सुद्धा येईल.

9.सकाळी उठल्यामुळे तुमच्या तब्येतीत फरक दिसेल, त्यामुळे दुसऱ्या दिवशी स्वतःला प्रेरीत करून जागे व्हाल.

10.आदल्या रात्री इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळा. तुमची ही सवय स्लिप सायकल डिस्टर्ब करू शकते. झोपण्याच्या आधी निदान एक तास आधी तरी स्क्रीन पासून लांब राहा.

11.सकाळी उठण्यासाठी ध्येय असणे अत्यंत महत्वाचे आहे. उदाहरण म्हणायचे झाल्यास सकाळी उठून तुम्हाला व्यायाम करायचा आहे, अभ्यास करायचा किंवा नवीन काहीतरी शिकायचं आहे हे ठरविले तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठण्यासाठी तुम्ही स्वतःला प्रेरीत करू शकता.

 

 


हेही वाचा : उशीच्या कव्हरवरील डाग असे हटवा

 

- Advertisment -

Manini