चंदा मांडवकर
पिरियडसच्या दरम्यान बहुतांश महिलांना काही समस्यांचा सामना करावा लागतो. यावेळी चिडचिड होणे,
डोकेदुखी, कंबर दुखी अशा समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. हा त्रास जरी वरवर पाहता सामान्य वाटत असला तरी काहीजणींनी पिरियडसमध्ये पोटात प्रचंड वेदना होतात.
यामुळे वेदनेपासून सुटका होण्यासाठी वेदनाशमक पेनकिलर घेतल्या जातात. मात्र असे वारंवार करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. कारण त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे या दिवसात काय करावे आणि काय टाळावे हे समजून घेणे आवश्यक आहे.
पिरियड्सच्या वेळी काय करावे?
-कोमट पाण्याने आंघोळ
पाळीच्या दिवसात बऱ्याच जणींना पायात गोळे म्हणजे क्रँम्प्स येतात. यावेळी पायाचे स्नायू पिळल्यासारखे होते. यामुळे या दिवसात गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ केल्याने आराम मिळतो.

-व्यायाम
व्यायाम हा एकमात्र उत्तम उपाय आहे ज्यामुळे शारिरीक थकवा आणि मानसिक तणाव कमी होऊन मन स्थिर होते. पिरियडसमध्ये
हार्मोन्समध्ये बरेच बदल होतात. यामुळे या दिवसात हलक्या स्वरुपाचा व्यायाम करावा. तसेच यावेळी योगा केल्यानेही फायदा होतो.
-हायड्रटे रहा
पाळीच्या दिवसात भरपूर प्रमाणात पाणी पिणे आणि रसाळ फळांसह हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. त्यामळु पिरियड्सवेळी त अशा गोष्टींचे सेवन केल्याने क्रँम्प्स पासनू दरू राहू शकता.

-डार्क चॉकलेट खा
पिरियड्स दरम्यान, डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जातो. डार्क चॉकलेट मध्ये लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्याचे सांगितले जात.
मॅग्नेशियम पीरियड्सच्या लक्षणांची तीव्रता कमी करत. त्याच सोबत डार्क चॉकलेटमुळे तणाव ही कमी होतो हे अभ्यासातनू सिद्ध झाले
आहे.
-भरपरू प्रमाणात प्रोटीनचे सेवन
डॉक्टरांकडून सल्ला दिला जातो की, प्रोटिन युक्त पदार्थ नेहमीच खाल्ले पाहिजेत. यामळु शरिराला उर्जा मिळते आणि
थकवा जातो. त्यामळु आहारात याचा समावेश करावा.
-स्वच्छता
या दिवसात शरीराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यासाठी दररोज अंघोळ करावी. अवयवांची स्वच्छता ठेवावी. पिरियड्सवेळी
इंन्फेक्शनची समस्या उद्भवू शकते. म्हणनूच डॉक्टर असा सल्ला देतात की, काही तासांच्या अंतराने फ्लो नुसार सॅनिटरी पॅड बदलणे गरजेचे आहे.
काय करु नये?
-असुरक्षित सेक्स
पिरियड्सवेळी सेक्स करणे ही सर्व सामान्य बाब आहे. मात्र पिरियड्स दरम्यान कंडोम शिवाय सेक्स केल्यास
गर्भ राहण्याची शक्यता असते. तसेच या दिवसात असुरक्षित सेक्स करण्यापासनू दूरू रहावे.

-जंक फूड
आपण जसे पाहिले की, पिरियड्स दरम्यान अधिक पौष्टिक पदार्थ, फळ, भाज्या खाणे गरजेचे आहे. खरंतर तुम्ही जे
काही खाता त्याचा परिणाम तुमच्या शरिरावर ही होतो. अशातच जंक फूड, अति गोड पदार्थ, खारट
पदार्थ खाल्ल्यास पायात क्रँम्प्सची समस्या अधिक वाढते.

-कॉफी
कॅफेनमुळे आपल्या रक्तवाहिन्या सकुंचित होतात हे अभ्यासातनू सिद्ध झाले आहे. त्यामळु पिरियड्स दरम्यान
कॉफी पिणे अथवा कॅफेन युक्त पदार्थ खाण्या पासनू दूरू रहावे. पण लक्षात ठेवा की, पिरियड्स दरम्यान दिवसभरात केवळ १ कपच कॅफेनचे सेवन करावे.
-गरम पाण्याची पिशवी
पिरियड्सवेळी पोट किंवा कंबरदुखीची समस्या कमी व्हावी म्हणनू आपण गरम पाण्याची पिशवी वापरतो.
पण त्याचा सतत वापर केल्यास ओटीपोटाच्या टिश्यलूा समस्या उद्भवू शकतात.
अल्कोहोल
अल्कोहोल अति प्रमाणात प्यायल्याने काय परिणाम होतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण
विज्ञानानुसार दारु प्यायल्याने व्यक्तीला उदासीनता येते. हे सिद्ध झाले आहे. अशातच पिरियड्स दरम्यान,
अल्कोहोलचे सेवन केल्यास मन अधिक खिन्न होते. निराश वाटते यामुळे या दिवसात दारूचे सेवन टाळलेले बरे.
Keywords: